सराफ व सुवर्णकार संघ ‘हॉलमार्क’ अटींविरुद्ध न्यायालयात जाणार...

The Saraf and the goldsmith association will go to court against the 'Hallmark' terms
The Saraf and the goldsmith association will go to court against the 'Hallmark' terms
Updated on

कोल्हापूर - हॉलमार्क कायद्याला विरोध नाही, त्यातील जाचक अटींना विरोध आहे. त्या दूर करण्यासाठी १५ दिवसांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी आज येथे व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघातर्फे ‘हॉल मार्किंग कायदे’ या विषयावर आज महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कायदा ग्राहक आणि सराफांच्याही फायद्याचा आहे; मात्र ठरावीक कॅरेटचीच हॉलमार्क सक्ती चुकीची आहे. यासाठी आंदोलने करून काही मिळणार नाही. त्या साठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे हेच योग्य असल्याचे सांगून ॲड. रांका यांनी सराफांच्या अडचणी मेळाव्यात मांडल्या. 
ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने नुकताच कायदा करून एक वर्षांची मुदत दिली आहे. जानेवारी २०२१ पासून  हॉलमार्किग कायदा सक्तीचा केलेला आहे. यातून ग्राहकाचा फायदा होत असल्यामुळे त्याला आमचा विरोध नाही; पण ठरावीक कॅरेटचेच सोने विक्री करणे, त्याला हॉलमार्क घेणे हे चुकीचे आहे.

महाराष्ट्राला कॅरेटचे उच्च प्रतिचे सोन्याचे दागिने विकले जात  असताना येथे बंदीचे कारण नाही. उत्तर प्रदेशात कमी कॅरेटचे दागिने विक्री होतात, म्हणून तेथे सर्व कॅरेटचे सोने विक्री करण्यास बंदी आहे. मात्र महाराष्ट्रात असे करण्याचे काहीच कारण नाही. सोन्याचे नमुने घेऊन हॉलमार्क सेंटरमध्ये त्याची शुद्धता तपासली जाणार मात्र शुद्धता तपासताना चूक झाली, फरक पडल्यास शुद्धता तपासणी सेंटरवर कारवाई होणे अपेक्षित आहे. अशा अनेक बाबींचा विचार करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. ’’
ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस सायंटिस्टचे ‘एफ’, शाखा प्रमुख संजय कुमार यांनी तब्बल दोन तासांहून अधिक वेळात कायद्यातील कलम, बदल, दंड, कारवाई याबाबतचे सादरीकरण केले. वैद्यकीय सोन्याला हॉलमार्क लागू नाही. ज्या ठिकाणी ग्राहक येणार आहे, ती सर्व दुकानांनी हॉलमार्कची रजिस्ट्रेशन करणे आवश्‍यक आहे. जानेवारी २०२१ पासून प्रत्येक दुकान रजिस्ट्रेश झाले पाहिजे, तेथे त्यांनी हॉलमार्क ठरवून दिलेल्या पद्धतीनेच सोने विकले पाहिजे, अन्यथा कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट केले.

राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत यांनी प्रास्ताविक करून कोल्हापुरातील सद्यःस्थिती सांगितली. संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल स्वागत केले. संघाचे उपाध्यक्ष केरबा खापणे, पांडूरंग कुंभार, अमर गोडबोले, राजेंद्र शेटे, संजीव कुंभार, सचीन देवरुखकर, अविनाश मुखरे, राजू वायकर आदी व्यासपाठीवर उपस्थित होते.

सीमाभागातून बांधव

निपाणी, संकेश्‍वर, बेडकिहाळ, गोकाक, चिक्‍कोडी, रायबाग या सीमाभागातील सराफ व सुवर्णकार मोटारी सजवून मेळाव्याला हजर झाले होते. तसेच, सोन्या-चांदीचे दागिने विक्री करणारे आणि हॉलमार्क सेंटरचेही स्टॉल मेळाव्याच्या ठिकाणी मांडले होते. जिल्ह्यातील सुमारे दीड हजार व्यापाऱ्यांनी मेळाव्याला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com