आकुर्डेत कोरोना बाधित सापडलेल्या 'त्या' व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू...

The search for the person in contact with thatperson who was found infected with Corona in Akurde
The search for the person in contact with thatperson who was found infected with Corona in Akurde
Updated on

गारगोटी - आकुर्डे (ता. भुदरगड) येथील एका मुंबईस्थित व्यक्तीचा 'कोरोना'  रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर भुदरगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर आकुर्डेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर प्रशासकीय यंत्रणेने गावात तातडीच्या उपाययोजनांचा अवलंब सुरू केला आहे.तर 'त्या' व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध शासकीय यंत्रणेने सुरू केला आहे.पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी संबंधित व्यक्तीच्या गल्लीसह गावात कडक पोलिस बंदोबस्त नेमला आहे.  सकाळपासून गावात शुकशुकाट पहावयास मिळत आहे.दरम्यान, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी आकुर्डे गावासाठी प्रतिबंधित क्षेत्र आदेश लागू केला आहे.

प्रतिबंधित क्षेत्र घोषित

आकुर्डे गावासह परिसरात कोरोना विषाणूचा संसर्गजन्य प्रसार रोखण्यासाठी आकुर्डे गावच्या तसेच चारही बाजूच्या गारगोटी (पूर्व), देवकेवाडी (पश्चिम), शेणगाव (दक्षिण) व महालवाडी (उत्तर) या गावांच्या सीमा बंद करणे आवश्यक आहे. यासाठी आदेशाद्वारे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. यानुसार ग्रामपंचायतीने कार्यवाही सुरू केली आहे. सर्व रस्ते बंद केले आहेत. आरोग्य विभागाने या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व इतर व्यक्तींची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.        

 प्रांताधिकारी संपत खिलारी, उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर, तहसीलदार अमोल कदम, पोलिस निरीक्षक संजय पतंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एत्नाळकर यांच्यासह महसूल, पोलिस व आरोग्य विभागाच्या यंत्रणेने आकुर्डेत सकाळपासून तातडीच्या उपाययोजनांचा अवलंब सुरू केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून जोरदार हालचाली सुरू आहेत.                  

आकुर्डेतील ५४ वर्षाची ही व्यक्ती आहे. मुंबईत तो चालक म्हणून काम करतो. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावातील गरोदर महिलेला ती घेऊन आला होता. महिलेला सोडून तो आपल्या मूळ गावी आला होता. १६ एप्रिलपासून कडगाव प्राथमिक केंद्र अंतर्गत आकुर्डेतील प्राथमिक शाळेत त्याला क्वाॅरंनटाईन केले होते. पण १४ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच त्याच्या घशात दुखू लागल्याने  त्याचा स्त्राव घेतला होता. त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर तात्काळ त्याला रात्री दीड वाजता सीपीआरमध्ये दाखल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com