लॉकडॉऊनमुळे हंगामी व्यवसाय डबघाईला

ऋषिकेश राऊत
Wednesday, 22 April 2020

लॉकडॉऊनमुळे सर्वच हंगामी व्यवसाय डबघाईला आले आहेत. सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असून व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट गडदपणे दिसत आहे. मार्च ते मे महिन्यामध्ये अनेकजण हंगामी व्यवसायाला प्राधान्य देतात. मार्च ते मे या तीन महिन्यात कमावलेल्या पैशातून अनेकजण पुढील नऊ महिन्यांची आर्थिक नियोजनाचे घडी बसवतात. हे नियोजन च कोलमडल्यामुळे सध्या या हंगामी व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. 
मार्च ते मे महिन्यामध्ये अनेकजण हंगामी व्यवसायाला प्राधान्य देतात. यामध्ये रसवंती, फळ विक्री, बर्फगोळ्याची गाडी लावणे, थंड पाण्याचे माठ विक्री, विविध शितपेयांचे दुकाने लावणे, लग्नसराईत फेटे बांधणे, आचारी वर्ग, कूलर विक्री व दुरुस्ती, आरो प्लांट आदी व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात.तर यातील काही व्यवसायिक जानेवारी महिन्यात आपल्या मालाची खरेदी करून ठेवतात. परंतु यावर्षी आलेल्या कोरोना या वैश्विक महामारी ने सर्वांच्या व्यवसायाचे गणित बिघडवले आहे.

इचलकरंजी : लॉकडॉऊनमुळे सर्वच हंगामी व्यवसाय डबघाईला आले आहेत. सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असून व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट गडदपणे दिसत आहे. मार्च ते मे महिन्यामध्ये अनेकजण हंगामी व्यवसायाला प्राधान्य देतात. मार्च ते मे या तीन महिन्यात कमावलेल्या पैशातून अनेकजण पुढील नऊ महिन्यांची आर्थिक नियोजनाचे घडी बसवतात. हे नियोजन च कोलमडल्यामुळे सध्या या हंगामी व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

मार्च ते मे महिन्यामध्ये अनेकजण हंगामी व्यवसायाला प्राधान्य देतात. यामध्ये रसवंती, फळ विक्री, बर्फगोळ्याची गाडी लावणे, थंड पाण्याचे माठ विक्री, विविध शितपेयांचे दुकाने लावणे, लग्नसराईत फेटे बांधणे, आचारी वर्ग, कूलर विक्री व दुरुस्ती, आरो प्लांट आदी व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात.तर यातील काही व्यवसायिक जानेवारी महिन्यात आपल्या मालाची खरेदी करून ठेवतात. परंतु यावर्षी आलेल्या कोरोना या वैश्विक महामारी ने सर्वांच्या व्यवसायाचे गणित बिघडवले आहे. सर्व उद्योग 23 मार्चपासून ठप्प आहेत. त्यामुळे शहरातील हजारो हंगामी व्यावसायिकांचे उपजीविकेचे साधन जागीच ठप्प आहे. 

रसवंती व्यावसायिक, माठ, कुलर विक्री, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्यावसायिक यांचे व्यवसाय हे हंगामी असून उन्हाळ्याच्या दिवसात त्यांचे व्यवसाय तेजीत असतात. त्यामुळे यावर्षी हंगामी व्यवसाय करणाऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर व्यवसाय सुरळीत होतील. परंतु यावर्षी हंगामी व्यवसायिकांना उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुलर, फ्रीज दुरुस्ती साठी अनेक व्यावसायाकडे ग्राहकांनी घरी येऊन दुरुस्तीची कामे करण्याचा तगादा लावला आहे. परंतु दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वस्तू मिळणारे दुकाने बंद असल्याने सर्वांचीच पंचाईत झाली आहे. 
 

माठ घरातच पडून
उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज लक्षात घेता जानेवारीपूर्वी तयार केलेले माठ घरातच पडून आहेत. आता या माठाचे करायचे तरी काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- सुरेश कुंभार, व्यावसायिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seasonal Business Stalled Due To Lockdown Kolhapur Marathi News