बामणेत क्वारंटाईनसाठी उभारली वसाहत

संजय खोचारे 
शनिवार, 23 मे 2020

बामणे (ता. भुदरगड) गावाबाहेर उभारण्यात आलेल्या राहूट्या (तंबू) सध्या चर्चेत आहेत. बामणे येथे मुंबईतील वास्तव्य असलेल्या नोकरदारांची सख्या जास्त आहे. "गड्या आपला गाव बरा..' या विचाराने चाकरमानी गावी परतले आहेत. मात्र पंधरावडा गावाबाहेरील शाळेत क्वारंटाईन ठेवणे सक्तीचे झाले. यातून गावकरी आणि मुंबईकर ग्रामस्थ यांच्यात गावोगावी वैचारीक मतभेद होताना चित्र दिसत आहे.

पिंपळगाव : बामणे (ता. भुदरगड) गावाबाहेर उभारण्यात आलेल्या राहूट्या (तंबू) सध्या चर्चेत आहेत. बामणे येथे मुंबईतील वास्तव्य असलेल्या नोकरदारांची सख्या जास्त आहे. "गड्या आपला गाव बरा..' या विचाराने चाकरमानी गावी परतले आहेत. मात्र पंधरावडा गावाबाहेरील शाळेत क्वारंटाईन ठेवणे सक्तीचे झाले. यातून गावकरी आणि मुंबईकर ग्रामस्थ यांच्यात गावोगावी वैचारीक मतभेद होताना चित्र दिसत आहे. 

बामणे गावाने मात्र क्वारंटाईन लोकांसाठी वेगळा पायंडा पाडला आहे. गावातील शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने ती अपुरी व दोनच खोल्या उपलब्ध आहेत. ग्रामसमितीच्या बैठकीतील चर्चेप्रमाणे गावकऱ्यांनी प्रत्येक चाकरमानी कुटूंबासाठी मंदिराजवळील मोकळ्या जागेत राहूट्या उभा केल्या. दोन राहूट्यांत योग्य अंतर ठेवले आहे. चाकरमान्यांसाठी तब्बल 20 राहूट्या बांधल्या आहेत. 

ग्रामपंचायतीने वीज, पाणी, आरोग्य सेवा, सॅनिटायझर, मास्क पुरवले आहे. गावातील ज्याच्या त्याच्या नातेवाईक, भाऊबंद यांनी आपापल्या लोकांना राहूट्यांचे साहित्य जमवले. या सर्व मुंबईकर बांधवांसाठी जणू नवी वसाहतच निर्माण केली. 
तरुण व शेतकरी बांधवांनी श्रमदान केले. बाहेरुन गावात आलेल्या नागरीकांची संख्या 115 आहे. आपल्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य धोक्‍यात येणार नाही. यासाठी सर्व मुंबईकर मंडळींनी काळजी घेऊन राहूट्यांत समाधानाने राहत आहेत. 
जोपर्यंत पुणे मुंबई या रेडझोन मधील लोक गावी आले नव्हते. तो पर्यंत खेडी सुरक्षित होती. मात्र बाहेरचे लोक गावी आल्यावर रुग्ण वाढू लागले. अशावेळी बामणे येथील पुणे-मुंबईकर चाकरमानी मंडळींनी थाटलेल्या राहूट्या गावांसाठी आदर्श पटर्न ठरत आहे. 

यामुळे क्वॉरंटाईन लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न मिटला व गावही सुरक्षित राहिले. बामणेचा आदर्श क्वॉरंटाईनची चर्चा सर्वत्र होत आहे. सरपंच बाळासो जाधव, ग्रामसेवक रंगराव गुरव, ग्राम दक्षता समिती सर्व सदस्य, आरोग्य विभाग कर्मचारी ,मुंबईकर ग्रामस्थांचे कुटूंबीय सातत्याने सुरक्षित उपाय योजना करीत आहेत. 

क्वॉरंटाईन लोकांना राहूट्यांत सुविधा ग्रामपंचायतीने पुरवल्या आहेत. वीज, शुद्ध पाणी उपलब्ध केले आहे. गावाचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी व मुंबईकर ग्रामस्थांच्या सोयी सुविधांसाठी ग्राम पंचायतीचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. 
- बाळासो जाधव,सरपंच बामणे (ता भुदरगड). 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Settlement for quarantine in Bamne