यंदा शिवजयंती साध्या ‌स्वरुपात ; मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

जुना बुधवार  पेठेतील  सहा तालीम  संस्था व ८० तरूण  मंडळांच्या वतीने २००१ पासून एकत्रितरित्या  तोरस्कर  चौकात प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते.

कोल्हापूर - संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती साध्या ‌स्वरुपात साजरी  करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरीच थांबून शिवप्रतिमा पूजन, शिवचरित्र  वाचन करण्याचे आवाहन केले असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.   

जुना बुधवार  पेठेतील  सहा तालीम  संस्था व ८० तरूण  मंडळांच्या वतीने २००१ पासून एकत्रितरित्या  तोरस्कर  चौकात प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते. व्याख्यानमाला, वत्कृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम,  मर्दानी खेळ,  शाहीरी, वृक्षारोपण, विद्युत रोषणाई, आकर्षक  देखावा,  पारंपरिक  वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक असे कार्यक्रम होतात. या उत्सवात जुना बुधवार पेठेतील  सर्व  जात- धर्माचे लोक, महिला, अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी  होऊन  राष्ट्रीय  एकात्मतेचे दर्शन  घडवितात. यंदा कोरोनामुळे मानवी आरोग्य  धोक्यात आहे.  देश लाॅकडाऊन  आहे.  अशा वेळी शिवजयंती  मोठ्या प्रमाणात  करणे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांना तिलांजली  दिल्यासारखे होईल,  म्हणून  शनिवारी (ता. २५) शिवजयंती दिवशी मंडळाचे  काही मोजकेच कार्यकर्ते सोशल डिस्टन्स पाळून शिवप्रतिमा पूजन व जन्मकाळ करतील. बाकी सर्वच नागरिकांनी  घरी थांबून आपापल्या  घरीच थांबून  शिवप्रतिमा पूजन व शिवचरित्र  किंवा पुस्तकाचे वाचन करून सर्वांनी घरावर भगवे ध्वज लावणयाचे आवाहन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचार विचार विनिमय  करून संस्थेच्याच्या वतीने  हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष धनंजय सावंत, माजी उप महापौर दिगंबर फराकटे, सचिव सुशिल भांदिगरे, उपाध्यक्ष संजय पाटील, नागेश घोरपडे, अनिल निकम, अमोल डांगे, संदीप देसाई, महावीर पोवार, नामदेव आवटे, संदीप राणे, अभिजित पाटील, उदय भोसले, मकरंद स्वामी यांनी दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivJayanti will be celebrated in a simple manner in kolhapur