काळभैरी रस्ताप्रश्‍नी रास्ता रोको

Shivsena Stop the way For Kalbhairy Road Kolhapur Marathi News
Shivsena Stop the way For Kalbhairy Road Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : शहरातील लाखेनगरातील कमानीपासून काळभैरी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप करत दर्जेदार रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आज लाखेनगरात रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मांजरेकर यांनी रस्ता कामाचा दर्जा सुधारण्याबाबत ठेकेदाराला सूचना देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. 

आठ दिवसापूर्वी शिवसेनेने या रस्त्याच्या निकृष्ठ कामाविषयी बांधकाम विभागाकडे तक्रार करून रस्ता दर्जेदार करण्याची मागणी केली होती. पंधरा दिवसापूर्वीच रस्त्याच्या बीबीएमचे काम सुरू झाले आहे. परंतु जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याचा दर्जा सुधारावा या मागणीसाठी शिवसेनेचे अशोक खोत, उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, उपतालुकाप्रमुख महादेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रास्ता रोको आंदोलन केले. 

लाखेनगर कमानीजवळ सर्व कार्यकर्ते रस्त्यावरच ठाण मांडून वाहतूक अडविली. अर्ध्या तासाच्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबून राहिली. बांधकाम विभागाचे उपअभियंता मांजरेकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. रस्त्याचे कारपेट अजून होणार आहे. ते तातडीने सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिली असून कामाचा दर्जा सुधारण्याबाबतच्या सूचना देवू, अशी लेखी ग्वाही दिली. तसेच काम तातडीने पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात प्रशांत नाईक, महेश गंधवाले, अशोक ढोणुक्षे, विलास दळवी, बाजीराव खोत, सचिन डवरी यांच्यासह बड्याचीवाडी, हडलगे ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस बंदोबस्त होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com