टोलवाटोलवीला कायदेशीर हिसका दाखवा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : प्रभागातील कामे वेळेत होत नसल्याने संतप्त नगरसेवकांकडून अधिकारी,कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे,मारहाण करणे हे प्रकार नित्याचेच होत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारी टोलवाटोलवी, यामुळे लोकप्रतिनिधी संतप्त होत आहेत. पण अशाप्रकारे होणाऱ्या मारहाणीचे समर्थन कधीच करता येणार नाही. टोलवाटोलवी, टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे, हाच यावरच उपाय आहे. 

कोल्हापूर : प्रभागातील कामे वेळेत होत नसल्याने संतप्त नगरसेवकांकडून अधिकारी,कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे,मारहाण करणे हे प्रकार नित्याचेच होत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारी टोलवाटोलवी, यामुळे लोकप्रतिनिधी संतप्त होत आहेत. पण अशाप्रकारे होणाऱ्या मारहाणीचे समर्थन कधीच करता येणार नाही. टोलवाटोलवी, टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे, हाच यावरच उपाय आहे. 

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका आता कांही महिन्यांवर येउन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत चुरस तर असणारच आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर प्रभागातील कामे गतीने करण्यासाठी महापालिकेतील नगरसेवक,पदाधिकाऱ्यांकडून अधिकारी,कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.मुळातच महापालिकेतील विविध कामांची प्रक्रियाही वेळकाढूपणाची आणि क्‍लिष्ट आहे.एका कामासाठी दहा ठिकाणी फिरावे लागते.मंजूरी घ्यावी लागते. त्यातील त्रुट्या दूर कराव्या लागतात.

एखादे काम मंजूर करणे आणि त्याची प्रक्रिया पुर्ण करुन त्याची वर्क ऑर्डर घेण्याच्या प्रक्रियेपर्यतचा पाठपुरावा करताना नगरसेवकाचेही डोळेही पांढरे होतात.इतकीही क्‍लिष्ट आणि वेळकाढूपणाची आहे. त्यामुळे अशा प्रक्रियेचा राग येतो.त्यात संबधित अधिकारी,कर्मचारी यांनी सहकार्य केले नाही तर मात्र नगरसेवक संतप्त होतात आणि अशाप्रकारे मारहाणीचा प्रकार घडतो.मुळातच कायदा हातात घेणे आणि मारहाण करण्याच्या प्रकाराचे समर्थन करता येणारच नाही. अशा टोलवाटोलवी करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना कायदेशीर मार्गानेच धडा शिकवायला हवा.त्यासाठी स्थायी, सर्वसाधारण सभा हे योग्य व्यासपीठ आहेत. अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या चुका या व्यासपीठावर दाखवायलाच हव्या.तसेच जे दोषी असतील त्यांच्यवर कारवाई व्हायला हवी. 

कामकाजाबाबत आत्मपरीक्षण व्हावे 
महापलिकेतील सर्व कामाच्या प्रक्रिया या वेळकाढूपणाच्या आहेत.त्यामुळे महापालिकेतून कोणतेही काम करताना नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. नाहक त्रास सहन करावा लागतो.अनेक कामावर विनाकारण अनेक सह्या घेण्याचे प्रकार आहे. रटाळवाणी आणि वेळकाढूपणाची प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक कामाच्या पध्दतीचा पुन्हा अभ्यास करुन या पध्दतीमध्येच आमुलाग्र बदल करावा लागणार आहे.अन्यथा महापालिकेतून कामेच होत नाही,या कारणास्तव मारहाण आणि शिवीगाळीचे असे प्रकार थांबविता येणे कठीण आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Show a legal jolt to Tolwatolwi