शुभमची कलाकृती ठरली देशात भारी 

Shubham's artwork became huge in the country
Shubham's artwork became huge in the country
Updated on

जरगनगर : पाचगाव परिसरातील शुभम गंगाधर सुतार याने साकारलेली "अभिजीत' ही शिल्पाकृती देशात भारी ठरली. मुंबईतील जहॉंगीर आर्ट गॅलरीत दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वतीने झालेल्या एकशे अठ्ठावीसाव्या अखिल भारतीय वार्षिक प्रदर्शनात त्याने देशभरातील अडतीस शिल्पकारांतून बाजी मारली.

त्याला व्यावसायिक गटात सवोत्कृष्ट शिल्पाकृतीसाठीच्या इंडिया आर्ट फेस्टीव्हल पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देण्यात आला. 

वि. स. खांडेकर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर एस. एम. लोहिया ज्युनियर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण शुभमने पूर्ण केले. त्यानंतर कलामंदिर महाविद्यालयात त्याने कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. कलामंदिर आणि शिल्पकला हे एक अतूट समीकरणच. साहजिकच याच क्षेत्रात शुभमने आपला वेगळा ठसा उमटवला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो व्यावसायिक शिल्पकार म्हणून सध्या कार्यरत आहे. नुकत्याच येथे झालेल्या भारतीय आशयाच्या समकालीन "कलाब्धि' महोत्सवांतर्गत प्रत्यक्ष शिल्प स्पर्धेतही त्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. 

सध्या पूर्णवेळ व्यावसायिक शिल्पकार म्हणून कार्यरत आहे. अखिल भारतीय पातळीवरील प्रदर्शनात पुरस्कार मिळाल्याने काम करण्याचा आत्मविश्‍वास आणखी वाढला आहे. 
- शुभम सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com