राज्यात परिचारिकांची  सहा हजार पदे रिक्त 

राज्यात परिचारिकांची  सहा हजार पदे रिक्त 

कोल्हापूर : राज्यात विविध रुग्णालयांत परिचारिकांची तब्बल सहा हजार पदे रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोरोनाचा आकडा वाढत असल्याने कामाचा अतिरिक्त ताण परिचारिकांना सहन करावा लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकड्याने तीस हजारी ओलांडली आहे. दिवसभरात सातशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. जिल्ह्यातील 79 कोरोना सेंटरवर बाधितांवर उपचार सुरू आहेत. यात परिचारिकांचे काम मुख्य असून, त्यांना रुग्णांची काळजी घ्यावी लागत आहे. परिचारिकांना सात दिवस ड्यूटी व सात दिवस क्वारंटाईन करणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यांना केवळ तीन दिवस क्‍वारंटाईन केले जात असल्याची परिचारिकांची तक्रार आहे. तसेच त्यांची ड्यूटी आठ तास असल्याने रुग्णांच्या संपर्कात त्यांना सातत्याने राहावे लागते. त्यातून राज्यभरातील पाचशेहून अधिक परिचारिका कोरोना बाधित आढळल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत रिक्त पदे भरली जाणार नाहीत, तोपर्यंत कामाचा ताण कमी होणार नाही, असे त्या सांगतात. 

सीपीआरमध्ये रिक्त पदे अशी : 
सीपीआरमध्ये एकूण 467 परिचारिकांची पदे आहेत. स्टाफ नर्सची 14 पदे रिक्त असून, एकूण पदांपैकी 11 गैरहजर, 26 रजेवर, 59 इनचार्ज सिस्टरपैकी 29 व अन्य 80 पदे रिक्‍त आहेत. कार्यरत परिचारिकांपैकी 37 आजपर्यंत बाधित झाल्या आहेत. 


परिचारिका जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. त्यांना बाधितांची काळजी घ्यावी लागत असून, कामाचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. रिक्त पदांची भरती तत्काळ होणे आवश्‍यक आहे.'' 
- हशमत हावेरी, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com