esakal | बनावट नोटाप्रकरणातील छोटे मासे गळाला
sakal

बोलून बातमी शोधा

 The small fish in the counterfeit note case swallowed

दोन हजार व शंभर रुपयाच्या बनावट नोटा छपाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एक लाख, अकरा हजार नऊशे रुपयांच्या बनावट नोटा व यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेले संशयित खिद्रापूर, टाकळीवाडी व अकिवाट येथील असून त्यांचा मास्टरमाईंड कर्नाटकात असल्याचे बोलले जात आहे. विठ्ठल बाबू परीट, रवींद्र मारुती परीट (रा. खिद्रापूर), लिंगाप्पा बाबासो कट्टेकरी (माळभाग अकीवाट), काकासो भुपाल कांबळे (टाकळीवाडी) यांना अटक केली आहे. 

बनावट नोटाप्रकरणातील छोटे मासे गळाला

sakal_logo
By
अनिल केरीपाळे

कुरुंदवाड ः दोन हजार व शंभर रुपयाच्या बनावट नोटा छपाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एक लाख, अकरा हजार नऊशे रुपयांच्या बनावट नोटा व यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेले संशयित खिद्रापूर, टाकळीवाडी व अकिवाट येथील असून त्यांचा मास्टरमाईंड कर्नाटकात असल्याचे बोलले जात आहे. विठ्ठल बाबू परीट, रवींद्र मारुती परीट (रा. खिद्रापूर), लिंगाप्पा बाबासो कट्टेकरी (माळभाग अकीवाट), काकासो भुपाल कांबळे (टाकळीवाडी) यांना अटक केली आहे. 
खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कुरुंदवाड पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत संशयित विठ्ठल बाबू परीट याच्या घरावर छापा टाकला असता 2 हजार रुपयाच्या एका बाजूने छापलेल्या 51 नोटा तर 100 रुपयाच्या एका बाजूने छपाई केलेल्या 99 नोटा अशा 1 लाख, 11 हजार 900 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना आढळल्या. नोटा तयार करण्यासाठी लागणारे रंगीत स्कॅनर प्रिंटर, नोटाची नक्कल तयार करण्यासाठी पांढऱ्या व पोपटी रंगाचा प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, इलेक्‍ट्रिक पॅनल बोर्ड, नोटा छपाईसाठी लागणारा कागद असा चौदा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 
याप्रकरणी पोलिस नाईक प्रकाश नारायण हंकारे यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, या बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मिळालेला नाही. खिद्रापूर गाव शिरोळ तालुक्‍याच्या टोकावर असून कर्नाटकच्या सीमेवर नदीकाठी वसले आहे. या बनावट नोटांचे कनेक्‍शन कर्नाटक असण्याची शक्‍यता वर्तवली असून तपासासाठी पथके रवाना केली आहेत. तपास सहाय्याक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ करीत असून प्रवीण मोहिते, प्रकाश हंकारे, असिफ सिराजभाई हे पथक प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

संपादन ः रंगराव हिर्डेकर