सामाजिक कार्यकर्ता भोरेंचा मृत्यू नाकर्तेपणामुळेच

social worker like Naresh Bhore  death case negativity shown by the municipality
social worker like Naresh Bhore death case negativity shown by the municipality

 इचलकरंजी :  नगरपालिकेने दाखवलेल्या नाकर्तेपणामुळेच नरेश भोरेसारख्या सामाजिक कार्यकर्त्याला जीव गमवावा लागला आहे. लोकांच्या आरोग्याच्या प्रश्‍नासाठी भोरे यांनी जाब विचारला, तर नगरपालिकेने त्याची थट्टा मांडली. वास्तविक भोरे यांच्या मृत्यूप्रकरणी नगरपालिकेच्या सर्वच अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची गरज अधोरेखित होत आहे. 

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी काम करणे हे आद्य कर्तव्य असलेल्या नगरपालिकेनेच वास्तविक कचरा उठाव करावा, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कचरा उठाव करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण कायदा आहे. त्यामध्ये कचरा उठावापासून विल्हेवाट लावण्यापर्यंत सारे काही सांगितले आहे. ते सर्व गुंडाळून ठेवले आणि याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यास त्याला असा जीव गमवावा लागतो.


चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई करा, इतकीच माफक अपेक्षा घेऊन भोरे हे प्रशासनाकडे गेले होते. प्रशासनानेही संबंधितांवर कागदोपत्री कारवाईची प्रक्रिया पार पडली; पण या सर्व प्रकारात भोरे यांचा मात्र नाहक बळी गेला. कोरोनाच्या संकटात बहुतांशी घटक होरपळून निघाले आहेत. आता कुठे शहर पूर्वपदावर येत आहे. अशा परिस्थितीत आज मन सुन्न करणारी घटना शहरात घडली. नरेश भोरे या सामाजिक कार्यकर्त्याचा नाहक बळी गेला. एखादी सर्वसामान्य व्यक्ती इतक्‍या टोकाचे पाऊल का उचलते, याचे मर्म त्या व्यवस्थेतच दडलेले असते. शासकीय यंत्रणाच जेव्हा अशा पद्धतीने ढिम्मपणा दाखवू लागते. आत्मदहनासारखा इशारा देऊन ही त्याकडे लक्ष न देता केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम केले जाते.

नागरिकांना वेळेत न्याय द्यावा
एकच भोरे नव्हे, तर अनेक भोरे सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने काम करीत असतात. त्यांना बळ देण्याऐवजी त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचे पाप किमान यापुढे तरी प्रशासनाकडून होणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांची आहे. त्यामुळे असे नाहक बळी तरी पुन्हा जाणार नाहीत. अशा या दुर्दैवी घटनेचा धडा प्रशासन पातळीवर गांभीर्याने घ्यावा व नागरिकांना वेळेत योग्य न्याय दिला जावा.

 संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com