इचलकरंजीत कोरोना विरुध्द लढाईत राबत आहेत हे 6 हजार जवान...

The staff has been in constant service even during the Corona companionship in ichalkaranji
The staff has been in constant service even during the Corona companionship in ichalkaranji
Updated on

इचलकरंजी - जगावर आलेल्या कोरोनाच्या संकट काळात फक्त आपण घरी बसावे आणि हे संकट परतवून लावावे यासाठी तब्बल इचलकरंजी शहरात 6 हजारहून अधिकजण रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. आपण घरात असतानाही आपल्याला सर्व सोयी सुविधा व अत्यावश्यक सेवा मिळविण्यासाठी अनेक कर्मचार्‍यांची अशा काळात जीव धोक्यात घालून काम करण्याची वृत्ती नक्कीच समाजाला गौरवास्पद आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून तसेच वेगवेगळ्या सेवा विभागाच्या माध्यमातून अविरतपणे या काळातही काम सुरू आहे. संसर्ग होऊ नये म्हणून आपण घरात बसतो तेव्हा हे सर्वजण आपापले कर्तव्य पार पाडीत आपल्याला सेवा आणि सुरक्षितता पोचवतात.

आरोग्य विभाग

इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल 1200 कर्मचारी दररोज काम करीत असतात. 1100 सफाई कामगार आणि 100 अधिकारी आणि कर्मचारी या कालावधीत सुट्टी न घेता काम करीत आहेत. यांना पालिकेतील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही मदत मिळत आहे.

पोलिस आणि गृहरक्षक कर्मचारी

या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर नागरिकांनी शिस्त पाळावी यासाठी थेट रस्त्यावर उतरून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. गावच्या सीमा रोखण्यापासून प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी या विभागातील 1 हजारहून अधिक मनुष्यबळ काम करत आहे.

वीज वितरण विभाग

शहरात अखंडीतपणे 24 तास वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 295 अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. यातील 225 कर्मचारी दररोज थेट भागा भागात जावून वीज पुरवठा अखंड ठेवण्यासाठी धडपडत आहेत.

फार्मासिस्ट

प्रत्येकाला आवश्यक असणारी औषधे पुरविण्यासाठी शहरातील 300 मेडिकल दुकाने या काळात सुरू आहेत. दुकानात औषध पुरवठा ते या दुकानासाठी लागणार्‍या औषध साठाच्या पुरवठ्यासाठी अनेकजण कार्यरत आहेत. तब्बल 950 जण यामध्ये सेवा देत आहेत.

डॉक्टर व रूग्णालय

शहरात खासगी व सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून तब्बल 2 हजार डॉक्टर, कर्मचारी, आरोग्य सेविका लॉकडाउनच्या काळात 24 तास अविरत सेवेत आहेत. कोणतेही संकट आले तर त्याबरोबर मुकाबला करण्यासाठी हे कर्मचारी व डॉक्टर अखंडपणे सजग राहिले आहेत.

बँका

शहरात तब्बल साठहून अधिक बँकामध्ये नागरिकांच्या अर्थकारणाला बळ देण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी 1100 हून अधिक कर्मचारी व अधिकारी अखंडपणे सेवेत आहेत.

हे राबतायहेत आपल्यासाठी

  • पोलिस आणि - 500
  • डॉक्टर आणि कर्मचारी- 2000
  • बँक सेवक व अधिकारी- 1100
  • मेडिकल दुकान मालक व कर्मचारी- 950
  • आरोग्य विभाग कामगार व अधिकारी- 1300

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com