कोल्हापुरात बालचित्रपट महोत्सवाला प्रारंभ...

Start of the Children's Film Festival in kolhapur
Start of the Children's Film Festival in kolhapur
Updated on

कोल्हापूर - विद्यार्थ्यांनी चांगले सिनेमे पाहिले पाहिजेत. कारण त्यातूनच त्यांच्या सामाजिक जाणिवा अधिक समृध्द होतील आणि भविष्यातील पिढी अधिक सजग होईल, असे स्पष्ट मत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले. येथील शाहू स्मारक भवनात चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते.

दरम्यान, अभिनेता आनंद काळे आणि शिक्षण समितीचे सदस्य नगरसेवक रत्नेश शिरोळकर यावेळी उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत कागदी विमान उडवून या महोत्सवाचे अनोख्या पध्दतीने उद्‌घाटन केले. जगभरातील दहा उत्कृष्ट बालचित्रपटांचे गोष्टीरूप कथानक असलेल्या "शिनेमा पोरांचा' या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे यावेळी प्रकाशन झाले. डॉ. कलशेट्टी यांनी कुठल्याही प्रकारचा कचरा न करता केलेल्या या पर्यावरणपूरक कार्यक्रमाबद्दल कौतुक करून शहर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विध्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही केले. 

अभिनेता आनंद काळे यांनी अशा उपक्रमाची गरज असल्याचे सांगितले. अरशद महालकरी, अनुजा बकरे आणि नसीम यादव या बाललेखकांचा सत्कार यावेळी झाला. शिक्षण समितीच्या शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, निहाल शिपुरकर, शैलेश चव्हाण, श्रीधर कुलकर्णी, अनिल कोकणे यांचाही विशेष सत्कार झाला. रविंद्र शिंदे यांनी प्रास्तविक केले. अभय बकरे यांनी आभार मानले. करवीरचे गट शिक्षणाधिकरी विश्वास सुतार, मिलिंद नाईक, सुधाकर सावंत, मिलिंद कोपार्डेकर, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, अनिल काजवे,गुलाबराव देशमुख, चंद्रशेखर तुदिगाल, ओंकार कांबळे आदी उपस्थित होते. 
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या 30 शाळांतील सोळाशे विद्यार्थी सहभागी झाले. दिवसभरात "बेब', "फ्री विली' आणि "पीटस ड्रॅगन' हे सिनेमे दाखविण्यात आले. 

विमान लक्षवेधी

महोत्सवाचा लोगो असलेल्या विमानाची भव्य प्रतिकृती शाहू स्मारक भवनाच्या प्रवेशद्वारात लक्षवेधी ठरते आहे. महापालिकेतील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी विमानांच्या कलाकृतींचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com