नवीन वर्षात तब्बल चार महिने सुट्टया ; ‘हॉलिडे’ची यादी झाली जाहीर

state government declared a timetable of holiday of next year in belgaum
state government declared a timetable of holiday of next year in belgaum

निपाणी (बेळगाव) : कोरोनाच्या कटू आठवणींसह हे वर्ष मावळतीला आले आहे. नवीन वर्षारंभासाठी केवळ काही दिवस बाकी आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या प्रशासन विभागाने २०२१ वर्षातील १९ सार्वजनिक सुट्या जाहीर केल्या. वर्षभरातील ५२ रविवार व तेवढेच शनिवार यासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहीर पाच सुट्या, दिवाळी सुटी असे एकूण १२५ दिवस म्हणजे तब्बल चार महिन्यांच्या सुट्यांची नवीन वर्षात चाकरमान्यांना 
पर्वणी असेल.

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने रविवारी व दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी असते. त्यामुळे या दिवशी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामापासून सुटका मिळते. याशिवाय सण, उत्सव, राष्ट्रीय सण व स्थानिक प्रशासनाच्या सुटीकडे कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. यंदा रविवारी पाच सुट्या आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांचा हिरमोडही झाला आहे. सलग तीन दिवस सुट्या अशी नव्या वर्षाची सुरवात शुक्रवारने होईल.

पहिली शासकीय सुटी प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला असेल. ९ मार्चला होळीची सुटी सोमवारी आल्याने तीन दिवस सलग सुटी मिळेल. याशिवाय २ एप्रिल, सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी व ऑक्‍टोबरमध्ये दसरा शुक्रवारी आल्याने तेव्हाही सलग सुटी आहे. दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्मीपूजन गुरुवारी, बलिप्रतिपदा शुक्रवारी व पुढील दोन दिवस अशी चार दिवसांची सुटी सलगपणे उपभोगता येईल. त्याच महिन्यात गुरू नानक जयंती सुटीही शुक्रवारीच आहे.

कोरोनाने वाईट गेले २०२० वर्ष 

२०२० हे कोरोनाच्या प्रभावाने अत्यंत वाईट, भीतीचे व त्रासदायक गेले. नवीन वर्षात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता व्यक्त होत असली, तरी अजूनही प्रभाव दिसत नसल्याचे चित्र दिसून येते. मात्र, काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com