आरग मध्ये 'जनता कर्फ्यू' यशस्वी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

कडकडीत बंद ; व्यापार पेठ सायलेंट झोन वर, उस्फुर्त प्रतिसाद

आरग (मिरज) - देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. आरगसह परिसरातील गावानी या जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग येत शांततेची सहकार्य केले.

सकाळी सात पासूनच गावातील मुख्य बाजारपेठेसह, चौकाचौकात, रस्त्यावर, गल्लोगल्ली शुकशुकाट दिसत होता. गावात मिळणाऱ्या अत्यावश्यक सुविधा मेडिकल्स, हॉस्पिटल किराणा दुकान व अन्य सुविधा दिवसभर पूर्णपणे बंद होत्या. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. गावातील सर्व दुकानांची शटर डाऊन राहिले. गावातील एसटी स्टँड परिसर ,ग्रामसचिवालय चौक, महादेव मंदिर तुळशी कट्टा परिसर, महावीर चौक, पेठ भाग, हनुमान मंदिर व अन्य परिसर पूर्ण पर्यंत सायलेंट झोन मध्ये होते. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. एका दुसरे वाहन दिसले की पोलिसांच्या कडून कसून चौकशी करण्यात येत होती. व्यापार उद्योग पूर्णपणे बंद होता. तसेच आरगकरानी जनता कर्फ्यू मध्ये स्वयंपूर्ण तिने उस्फूर्तपणे सहभाग घेत इतर वेळी गजबजून गेलेला परिसर कडकडीत बंद होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successfully done of Janata Curfew in Arag miraj