स्वॅब उशीरा येतोय, रूग्णांचा आकडा वाढतोय 

The swab is coming late, the number of patients is increasing
The swab is coming late, the number of patients is increasing
Updated on

कोल्हापूर : कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर त्याचा उशीरा येणारा अहवाल जिल्ह्यात समूह संसर्ग होण्यास कारणीभूत ठरत आहे. स्वॅब घेतल्यानंतर संबंधिताला त्याचा अहवाल येईपर्यंत घरी किंवा संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवले जाते, या दरम्यान त्यांचा अनेकांशी संपर्क येतो, त्यातून कुटुंबातील आणि संपर्कातील लोकही बाधित झाल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसते. हे टाळण्यासाठी स्वॅबचा अहवाल तातडीने येणे गरजेचे आहे. 
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात केवळ 54 कोरोनाबाधित होते, आता ही संख्या 15 हजाराच्या पुढे गेली आहे. यापैकी सहा हजार रूग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी अजूनही सुमारे साडेसात हजार रूग्ण उपचार घेत आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 405 जणांचा बळी गेला आहे. पंधरा दिवसांत तर रोज 500 ते 600 नव्या रूग्णांची भर पडत आहे. पण त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सरकारी आणि खासगी रूग्णालयातही जागा शिल्लक नाहीत. 
शहरात सीपीआरसह डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटलसह काही खासगी रूग्णालये व प्रयोगशाळेत स्वॅबची तपासणी केली जाते. एखाद्या रूग्णाचा आज स्वॅब घेतला तर त्याचा अहवाल येण्यास किमान दोन-तीन दिवस लागतात. तोपर्यंत संबंधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येते. या व्यक्तीचा अहवाल जरी तातडीने आला तरी त्याच्यामुळे होणारा समुह संसर्ग टाळणे शक्‍य आहे. त्यासाठी पॉझीटीव्ह अहवाल आलेल्या व्यक्‍तीला इतरांपासून दूर ठेवणे आवश्‍यक आहे. 

या सुविधांचा अभावच 
अहवाल पॉझीटीव्ह आला आणि घरीच संबंधितांना ठेवायचे झाल्यास त्यासाठी स्वतंत्र खोली, शौचालय असणे आवश्‍यक आहे. पण सर्वच रूग्णांच्या घरी अशा सुविधा असतीलच असे नाही. पण रूग्णालयातच जागा नसल्याने अशा रूग्णांना सुविधा नसूनही घरी ठेवण्याचा मोठा धोका समूह संसर्गात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com