esakal | शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला 'या' तारखे पासून प्रारंभ....
sakal

बोलून बातमी शोधा

The teacher transfer process starts in karnatka

 शिक्षकांना दिलासा...

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला 'या' तारखे पासून प्रारंभ....

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव - शाळा कधीपासुन सुरु होणार याबाबत निश्‍चित माहिती नाही. तरीही शिक्षण खात्याने शिक्षकांसाठी एक आंनदाची बातमी दिली असुन 20 ऑगस्टपासुन शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे. याबाबतचे वेळापत्रक 15 ऑगस्टपर्यंत जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासुन बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. 

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि नव्याने लागु झालेले राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे यावेळी बदली प्रक्रिया रखडण्याची चिन्हे दिसुन येत होती. मात्र शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन बदली प्रक्रिया सुरु करण्याची सुचना केली आहे. त्यानुसार वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर ऐच्छिक, परस्पर बदलीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.

वाचा - बकरी ईद का साजरी करतात माहित आहे का ? जाणून घ्या....

शिक्षण खात्याने गंभीर आजारी असलेल्या शिक्षकांसह एकाद्या शिक्षकाच्या घरातील पती, पत्नी किंवा मुल आजारी असेल तर त्यांना बदली प्रक्रियेपासुन दुर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 40 टक्‍के अपंगत्व असलेले शिक्षक, गर्भवती किंवा एक वर्षांपेक्षा कमी वयाचे बाळ असलेल्या शिक्षकेला, माजी सैनिक व मृत सैनिकाची पत्नी तसेच 50 वर्षांपेक्षा अधिक वयाची शिक्षीका व 55 वर्षांपेक्षा अधिक वयातील शिक्षक यांनाही बदली प्रक्रियेपासुन सुट देण्यात आली आहे. मात्र याबाबतचे प्रमाणपत्र शिक्षण खात्याकडे देणे आवश्‍यक आहे. 

गेल्या वर्षी शिक्षण खात्याने सक्‍तीची बदली प्रक्रिया राबविली होती. यामध्ये एकाच ठिकाणी दहा वर्षांपेक्षा अधिक दिवस सेवा बजावलेल्या शिक्षकांचा समावेश होता. त्यामुळे सक्‍तीच्या बदलीबाबत शिक्षकांमधुन मोठया प्रमाणात नाराजी व्यक्‍त झाली होती. मात्र यावेळी बदली प्रक्रिया नव्या नियमानुसार राबविली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक स्नेही बदली प्रक्रिया राबविण्यास मदत होईल असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. 
 

शिक्षक बदलीला लवकरच चालना दिली जाणार असुन याबाबत तयारी करण्याची सुचना करण्यात आली आहे. वेळापत्रक जाहीर होताच शिक्षकांना याबाबत माहिती दिली जाईल. 
- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी
 

संपादन - मतीन शेख