दहावीची परीक्षा या तारखेला ; विद्यार्थ्यांनो लागा तयारीला...

tenth exam which was postponed due to lockdown will not be canceled in karnataka
tenth exam which was postponed due to lockdown will not be canceled in karnataka
Updated on

बेळगाव - लॉकडाउनमुळे पुढे ढकललेली दहावीची परीक्षा कोणत्याही परिस्थिीतीत रद्द केली जाणार नाही. असे शिक्षण खात्याने स्पष्ट केले असुन विद्यार्थी किंवा पालकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच जुनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात परीक्षा घेण्यात येतील याबाबतचे वेळा पत्रक 20 मे पर्यंत जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्पातील लॉकडाऊन संपल्यानंतर 4 किंवा 5 मे रोजी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार होते, मात्र लॉकडाऊन 17 तारखेपर्यंत वाढविण्यात आल्याने परीक्षा होणार की नाही. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे मात्र शिक्षणमंत्री सुरेशकुमार राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना कोरोनाचे संकट असले तरी परिस्थितीनुसार सर्व आवश्‍यक सुरक्षा उपायांचे पालन करून परीक्षा घेण्यात येतील अशी माहिती दिली आहे. तसेच परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर सोय करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये ताप किंवा इतर प्रकारच्या आजारांची लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात येईल मात्र कोणत्याही परिस्थितीत परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहितीही शिक्षण मंत्र्यानी दिली आहे.

परीक्षा सुरु होण्याच्या वेळेतही राज्यात अशीच परिस्थिती असल्यास परीक्षा केंद्राची संख्या वाढविण्याचा विचार शिक्षण खात्याकडुन सुरु असुन गरज भासल्यास जवळच्या शाळांमधून आवश्‍यक बेंच एकत्र करून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अधिक खोल्या निर्माण केल्या जातील. गरज पडल्यास एका खोलीत 16 विद्यार्थी बसविले जातील यादृष्टीने परीक्षा केंद्राची संख्या वाढविता येईल का याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी चाचपणी करावी अशी सूचनाही मंत्री सुरेशकुमार यांनी केली आहे. त्यामुळे जुन महिन्यात परीक्षा होतील याची दखल विद्यार्थी व पालकांनी घेणे आवश्‍यक आहे. तसेच सोशल मिडीयावरुन फिरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास न ठेवता परीक्षेची तयारी चांगल्या करणे आवश्‍यक आहे असे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
 

शिक्षण खात्याने जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार परीक्षेची तयारी केली जाईल विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे
अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com