आयटी पार्कजवळ उभारणार नाट्यगृह 

आयटी पार्कजवळ उभारणार नाट्यगृह 

कोल्हापूर : शहरात आणखी एक नवे बहुउद्देशीय सभागृह (नाट्यगृह) बांधण्यासाठी राज्यसरकारने पाच कोटी रुपये मंजूर केले असून या सभागृहासाठी महापालिकेने आयटी पार्कजवळची जागा निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या नाट्यगृहासाठी 28392 चौरस मीटर जागेची आवश्‍यकता आहे. याबाबतची माहिती महपालिकेने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पंडीत कंदले व सुनिल माने यांना एका पत्राव्दारे दिली आहे. 

कोल्हापूर शहरात केशवराव भोसले हे एकमेव नाट्यगृह आहे. हे नाट्यगृहदेखील 700 आसन क्षमतेचे आहे. कोल्हापुरात एका मोठ्या नाट्यगृहाची गरज होतीच. यासाठी गेल्या कांही वर्षापासून प्रयत्न सुरु होते. तत्कालीन आघाडी सरकारने केशवराव भोसले नाट्यगृहातील सुधारणा करण्यासाठी गतवेळी 9 कोटी रुपयांचा निधी दिला होता. यामधून या नाट्यगृहाचे रुपडेच पालटण्यात आले. चांगल्या दर्जाच्या खुर्च्या, नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणेसह विविध कामे करण्यात आली. 

कोल्हापूर शहर प्रचंड वेगाने विस्तारत आहे. मात्र शहराचा सांस्कृतिक वारसा असलेल्या संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील आसन क्षमता कांही कार्यक्रमासाठी तोकडी पडते. त्याशिवाय या नाट्यगृहाखेरीज अन्यत्र कुठेही नाट्यप्रयोग घेता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शहराचा हा ऐतिहासिक वारसा जपतानाच आता नव्या नाट्यगृहासाठीच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. 

राज्यात डिसेंबर 2019 मध्ये नवे आघाडी सरकार आल्यानंतर कोल्हापूरला दुसरे नाट्यगृह होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनीही या नव्या नाट्यगृहासाठी प्रयत्न सुरु केले होती. या प्रयत्नांना आता यश मिळाले असून पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. 

हे नाट्यगृह उभा करायचे कोठे?यासाठी जागेचा शोध सुरु होता. केशवराव भोसले नाट्यगृहाजवळच्या जागेबाबत विचार सुरु होता. पण ही जागा अपुरी पडणार असल्याने आयटी पार्कजवळची जागा निश्‍चित करण्याचे काम महापालिकेतर्फे सुरु आहे. 

शहर अभियंत्याकडून विभागांना पत्रे 
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी याबाबतची पत्रे नगररचना विभाग आणि इस्टेट विभागाला दिली आहेत. या दोन्ही विभागाकडून जागेची निश्‍चिती लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या नाट्यगृहाबाबतचे सर्व आराखडे तयार केले जातील. त्याला मंजूरी घेतली जाईल. त्यानंतर या नाट्यगृहाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com