.. तर सरकारी नोकऱ्या सोडून द्या 

.. तर सरकारी नोकऱ्या सोडून द्या 

कोल्हापूर : राज्यपालांच्या पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा आज सकाळी चर्चेची विषय ठरली. दोरी बांधलेली कळत नाही का? सरकारी नोकऱ्या सोडून द्या, असे सांगताना दोरीच्या आत नजरचुकीने जाणाऱ्या ज्येष्ठांशी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनींशी अरेरावीच्या भाषा वापरल्यामुळे पोलिस नेमके आहेत, तरी कोणासाठी? असा प्रश्‍न उपस्थित झाला. 

राज्यपालांचा दौरा आहे, म्हटल्यावर बंदोबस्त कडक असणार याबाबत दुमत नव्हते. महालक्ष्मी बॅंकेकडून सकाळपासूनच वाहतुकीसाठी रस्ता बंद केला होता. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही व्हीआयपी येणार असल्याची जाणीव झाली. दादू चौगुले यांच्या निवासस्थानाच्या पुढील बाजूला दोरखंड अडवून नागरिकांना प्रवेश रोखला होता. विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मात्र एका बाजूने प्रवेश दिला. 

बंदोबस्तासाठी पोलिस दोरखंडाच्या आत नजरचुकीने जरी कोणी आत गेला तर "चला बाहेर' अशा करड्या आवाजात दमच देत होता. नोकरी आहे, जबाबदारी आहे, याबाबत कुणाची अडचण नव्हती. दस्त नोंदणीची कार्यालये या परिसरात आहेत. तेथे जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचीही अडचण झाली. दोरी बांधलेली कळत नाही का? सरकारी नोकरी सोडून द्या असे शब्द बाहेर पडले त्यावेळी अनेकजण अवाक्‌ झाले. महाविद्यालयीन तरुणी जी नजरचुकीने आतमध्ये गेली तिचा असा काही पानउतारा झाला की ती तरुणी खाली मान घालून बाहेर पडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com