भीषण अपघातात पन्हाळा दशर्नासाठी निघालेले तीन मित्र ठार...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

कोल्हापूरहून दुचाकीवरून पन्हाळा दर्शनसाठी जात असताना तिहेरी अपघातात दोघा तरूणाचा जागीच ठार झालेत तर एका तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पोर्ले तर्फ ठाणे - कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील नलवडे बंगल्याजवळील ग्रीनपार्क हाॅटेलच्या समोर झालेल्या तिहेरी अपघातात दोघा तरूणाचा जागीच ठार झालेत तर एका तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.सरोज तानाजी पोवार (वय २०, रा.मोरेवाडी, ता.करवीर), शिवरंजक साताप्पा मरेन्नवार (वय १८ रा.निमशिरगाव,ता.हातकलंगले), आकाश तानाजी कदम (वय २०, १५ वी गल्ली, जयसिंपूर) अशी मृत तरूणांची नावे आहेत.दोन दुचाकी आणि व्हॅनच्या समोरासमोर धडकेत हा अपघात दुपारी एक वाजता घडला.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

असा घडला अपघात -

घटना स्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - सरोज पोवार, शिवरंजक मरेन्नवार आणि आकाश कदम कोल्हापूरहून दुचाकीवरून पन्हाळा दर्शनसाठी जात होते तर उदय भानुदास मुळे (वय ४३,रा.सांगली) हे पन्हाळ्यावरून व्हॅन घेऊन केर्ले गावाकडे येत होते.नलवडे बंगल्याजवळील ग्रीनपार्क हाॅटेलच्या समोर व्हॅन आणि दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.या धडकेत सरोज आणि शिवरंजक यांचा जागीच मृत्यू झाला.तर आकाशवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण दहावी पासुनचे मित्र होते.रविवार सुट्टीचा वार गाठत त्यांनी पन्हाळा दर्शनाचा प्लॅन आखला होता.परंतु रस्त्यातच त्यांच्या वर काळाने घाला घातला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three friends of Jaisimpur killed in panhala accident