'या' शहरात सांडपाणी साचते थेट नागरिकांच्या दारात, पावसामुळे त्रास दुप्पट

Trouble To The Citizens Due To Sewage Kolhapur Marathi News
Trouble To The Citizens Due To Sewage Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील भडगाव रोडलगत असणाऱ्या माणिकबाग वसाहतीत सांडपाणी साचले आहे. सांडपाणी निचरा होण्याची जागा अडविल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: पावसामुळे हे सांडपाणी काही घरांच्या अंगणात पसरले आहे. याबाबत निवेदन देऊनही पालिकेने दुर्लक्ष केल्याची नागरिकांची तक्रार आहे. सांडपाणी निचरा होण्यासाठी पालिकेने नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. 

माणिकबाग वसाहतीतील शेवटच्या टोकाला असणाऱ्या घरांना सांडपाणी निचऱ्याचा प्रश्‍न गेल्या काही दिवसांपासून भेडसावू लागला आहे. गेल्या वर्षभरापर्यंत सांडपाणी निचऱ्याची जवळपास बांधकाम नसल्याने सोय होती. आता मात्र नवी घरे बांधताना या सांडपाणी निचऱ्यासाठी योग्य ती काळजी घेतलेली नाही. परिणामी, वरच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी नागरिकांच्या घरासमोरच साचू लागले आहे. पाऊस पडू लागल्यावर तर हा प्रश्‍न अधिकच बिकट होतोय. या सांडपाण्यात पावसाच्या पाण्याची भर पडते. त्यामुळे अंगणात सांडपाणी मिश्रित पावसाचे पाणी तुंबत आहे. त्यामुळे घरात ये-जा करणेही अडचणीचे ठरते.

सांडपाणी साचल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. परिसरात सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या पार्श्‍वभूमीमुळे परिसरातील राजू भोपळे, उत्तम अष्टेकर, आर. के. कोडोली, दिनेश गोरुले, विनया दड्डीकर, जयंत दळवी यांच्यासह 25 नागरिकांनी पालिकेकडे निवेदन देऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, मात्र सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी अद्याप कोणत्याच हालचाली न झाल्यामुळे हा प्रश्‍न कायम असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. 

नागरिकांची तक्रार दूर केली जाईल
स्थानिक नागरिकांची तक्रार लक्षात घेऊन भेट दिली होती. पण, शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पालिकेची यंत्रणा त्याच कामात व्यस्त आहे. दोन दिवसांत प्रशासनाला सूचना देऊन नागरिकांची तक्रार दूर केली जाईल. 
- नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी, गडहिंग्लज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com