सामाजिक बांधिलकी जोपासणारा संवेदनशील उद्योजक गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फाय उद्योग समुहाचे अध्यक्ष पंडितराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली

इचलकरंजी - उद्योगात धडाडी आणि सामाजिक क्षेत्रात बांधिलकी जोपासणारा संवेदनशील उद्योजक महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इचलकरंजीच्या फाय  समुहाचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष पंडितराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, फाय फाऊंडेशनच्या उपक्रमांतून पंडितराव कुलकर्णी यांनी इचलकरंजी सोबतच राज्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले. फाय प्रायव्हेट लिमिटेडने महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचा लौकीकही जगभर पोहचवला आहे. गुणवंताना पुरस्कार देऊन समाजातील चांगुलपणास दाद देण्याची आगळी परंपरा फाय फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु केली. फाऊंडेशन सामाजिक बांधिलकी म्हणून राज्यातील आणि देशातील अनेक आपत्तीच्या प्रसंगात मदतीसाठी धावून गेले आहे. पंडितरावांनी इंचलकरंजी सारख्या उद्यमी आणि श्रमिकांच्या नगरात पहिला लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मानही पटकावला होता. महाराष्ट्राने उद्योगात धडाडी आणि समाजाप्रती बांधिलकी जोपासणारा संवेदनशील उद्योजक गमावला आहे. पंडितराव कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray tributes to Panditrao Kulkarni President of fiy Industries Group