जोतिबाला जाण्यासाठी आता 'या' रस्त्याचाच आधार

use the road leading to Gaimukh Lake to reach Jyotiba
use the road leading to Gaimukh Lake to reach Jyotiba

जोतिबा डोंगर - श्री.क्षेत्र जोतिबा डोंगराला जाण्यासाठी आता भाविकांसह ग्रामस्थांना कायमस्वरूपी गायमुख तलाव मार्गे जाणाऱ्या रस्त्याच वापर सर्रास सर्वांना करावा लागणार आहे.
 कारण पाण्याचा टाका या परिसरातील सुमारे अर्धा किलोमीटर अंतर रस्ता दरवर्षी पावसाळ्यात खचून तुटून जातो. त्यामुळे या रस्त्यावर शासनास दरवर्षी कोटी रुपये खर्च करावे लागतात. येथील पावसाळी हवामान, दाट धुके, मोठा पडणारा पाऊस त्यामुळे चांगला दर्जदार केलेला रस्ता खचतो. पावसाळ्यानंतर गायमुख तलाव मार्गे जाणार्या रस्त्यालाच इथून पुढे येणारा निधी उपलब्ध करून हाच रस्ता चांगला करण्यासाठी शासनाने प्रयत्नशील राहाणे गरजेचे आहे.

गायमुख तलाव मार्गे रस्त्यावरील सर्व धोकादायक वळणे काढून रस्त्याचे नव्याने खडीकरण,रूंदीकरण गरजेचे आहे. दरम्यान,पाण्याचा टाका हा परिसर पूर्णपणे दलदलीचा असून या ठिकाणी सर्व जोतिबा डोंगरचे सांडपाणी रस्त्याचे ठिकाणी येते. त्यामुळे येथे अगदी उन्हाळ्यातही मोठी दलदल असते.गेल्या सात-आठ वर्षांपासून हा रस्ता तुटतो आहे. जोतिबा हे तीर्थक्षेत्र संबधीत गाव म्हणून या रस्त्यासाठी शासकीय विविध योजनेतून मुबलक निधी उपलब्ध होतो. आज पर्यंत सुमारे सात कोटी रुपये या पाण्याच्या टाका रस्त्याच्या कामासाठी खर्च करावा लागला आहे.

शासनाने आता या रस्ता दुरूस्तीचे काम बंद करून भविष्यात गायमुख तलाव भागात हा रस्ता अगदी तज्ञ लोकांची समिती स्थापन करून भूगर्भशास्त्रज्ञ यांची मते विचारात घेऊन  पर्यायी रस्ता कायमस्वरूपी टिकाऊ दर्जेदार राहण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
 

जोतिबावरचा पाणी टाका हा रस्ता दरवर्षी खचला जातो. परत हा रस्ता पावसाळा संपल्यावर दुरुस्त करावा लागतो. आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी या रस्त्याच्या कामासाठी खर्च करावा लागला आहे. जर का गायमुख तलावाचा रस्ताच कायमस्वरूपी दर्जेदार करून वापरात आणल्यास वारंवार रस्त्यासाठी शासनास खर्च घालावा करावा लागणार नाही. - शिवाजीराव सांगळे -उपसरपंच, जोतिबा डोंगर

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com