esakal | त्याने फासला महिलांच्या लढ्याला काळिमा
sakal

बोलून बातमी शोधा

Wine  dealer Arrest

वाशी (ता. करवीर) येथे मध्यवस्तीत सुरू असलेल्या दारू विक्रीवर करवीर पोलिसांनी सायंकाळी छापा टाकला. यामध्ये 19 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी श्रीपती पांडुरंग कुंभार (वय 80) याच्यावर गुन्हा दाखल केला.

त्याने फासला महिलांच्या लढ्याला काळिमा

sakal_logo
By
साईनाथ पाटील

हळदी ः  वाशी (ता. करवीर) येथे मध्यवस्तीत सुरू असलेल्या दारू विक्रीवर करवीर पोलिसांनी सायंकाळी छापा टाकला. यामध्ये 19 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी श्रीपती पांडुरंग कुंभार (वय 80) याच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाशी येथे मध्यवस्तीत काही महिन्यांपासून देशी दारूची विक्री सुरू होती. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर संबंधिताला समज दिली होती. तरीही तो चोरून दारू विक्री करीत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष होता. काही नागरिकांनी करवीर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय बांगर व नाईक बी.एम. पोत्रे यांनी पोलिसपाटील विनायक उलपे यांच्यासह श्रीपती कुंभार यांच्या शेडमध्ये छापा टाकला. यावेळी विक्रीस आणलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी मालक कुंभार याला ताब्यात घेतले असून 19 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास हवालदार दत्तात्रय बांगार करत आहेत.

दारूबंदी लढा प्रसिद्ध 
25 वर्षांपूर्वी येथील सरकारमान्य दारू दुकानाविरुद्ध 11 रणरागिनींनी लढा उभारला होता. तत्कालीन राज्य सरकारने संबंधित दुकानाचा परवाना रद्द केला. त्याचबरोबर लढ्यातील महिलांसह गावाचा 11 तोळ्याचे सुवर्णपदक देऊन गौरव केला होता. नंतर केंद्र स्तरावर या महिलांचा दिल्लीत सत्कार केला होता. तेव्हापासून गावांमध्ये दारु विक्री बंद आहे. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर