
कोल्हापूर : औद्योगिक आणि घरगुती कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे दर वेगळे करण्याचा विचार चांगला असली तरी त्याची वाट मात्र बिकटच आहे. उद्योगासमोरची अडचण दूर करायची असेल तर साखरेचे दुहेरी दर करून औद्योगिक व घरगुती कारणांसाठी वापरल्या जाणारे दर स्वतंत्र करावे लागतील. कृषी मूल्य आयोगाने तशी शिफारस केली आहे. हा पर्याय चांगला असला अंमलबजावणीच्या पातळीवर वाट मात्र बिकट आहे.
देशांतर्गत उत्पादीत होणाऱ्या एकूण साखरेपैकी 65 ते 70 टक्के साखर ही औद्योगिक कारणासाठी वापरली जाते. एका बाजूला उसाच्या एफआरपीत सातत्याने वाढ होत असताना कारखान्यांचा उत्पादन खर्चही वाढत आहे. तथापि एफआरपी निश्चित करताना साखरेचा दर मात्र गृहीत धरला जात नाही. दुसरीकडे साखर उद्योगाकडून मात्र साखरेच्या हमीभावात वाढ करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अलिकडेच कृषीमूल्य आयोगानेही साखरेच्या दुहेरी दराची शिफारस केली आहे. औद्योगिक साखरेचा दर जास्त व घरगुती वापराचा दर कमी असावा अशी ही शिफारस आहे. पण अंमलबजावणीच्या पातळीवर निर्णयात अडथळे जास्त आहेत.
शितपेये, कॅडबरी, बिस्किटे या उद्योगांचा साखर खरेदीचा वाटा त्या तुलनेत कमी आहे आणि ती थेट कारखान्यांकडून होते. पण मेवा, मिठाई, छोट्या डेअऱ्या, दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या यांची खरेदी मोठी असते आणि ती थेट कारखान्यांकडून होत नाही. अशा उद्योगात वापरला जाणाऱ्या साखरेचा दर वेगळा कसा करणार ? हा प्रश्न आहे. साखरेचे दुहेरी ठरवताना या कंपन्यांपेक्षा घरगुती वापराचे दर ठरवण्यात मोठी अडचण आहे. घरगुती ग्राहकाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत कमी दराने साखर देणे शक्य आहे पण ही व्यवस्था आता जवळपास बंद होत आहे. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वापराच्या साखरेचा दरच वाढवून गॅस अनुदानाच्या धर्तीवर ठराविक उत्पन गट ठरवून अशा ग्राहकाच्या थेट खात्यात अनुदान जमा करणे हा चांगला पर्याय होऊ शकतो.
...जास्त दर देण्याची प्रवृत्ती वाढेल
आज साखरेचा हमीभाव शासन वाढवत नाही आणि साखरेची मागणी नाही. त्याचा परिणाम एफआरपी देण्यावर झाला आहे. त्यातून काही कारखान्यांनी दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी शेतकऱ्यांकडून हमीपत्रे घेतली आहेत. साखरेचा हमीभावच वाढवला तर तेवढे जास्त कर्ज उचलता येईल. त्यातून एकरकमी एफआरपीशिवाय त्यापेक्षाही जादा दर देण्याची कारखान्यांची प्रवृत्ती वाढेल.
उसाला मार्केटींगची गरज नाही
इतर पिकांपेक्षा ऊस हे नगदी पिक आहे. त्याचबरोबर ऊसाला अन्य पिकांप्रमाणे स्वतंत्र मार्केटींग करावे लागत नाही. फळे, भाजीपाला, फुले यासारखी पिके एखाद्यावेळी फेकून द्यावी लागतात, तसे उसाचे होत नाही. नुकसान जरी झाले तर त्याचेही प्रमाण तुलनेने कमी असते. म्हणून सद्या तरी उसाला पर्याय असे पीक नाही. या बाबींचाही साखरेचा दर निश्चित करताना विचार करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.