ब्रेकिंग- नऊ कोटी चोरी प्रकरणातील संशयित सूत्रधार मोहिद्दीन मुल्लाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

2016 मध्ये वारणानगरमधील नऊ कोटीचे प्रकरण उजेडात आले होते

सांगली - संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडवलेल्या वारणानगर येथील नऊ कोटी रुपये चोरी प्रकरणातील संशयित सुत्रधार मोहिद्दीन मुल्ला याचा आज सांगलीत निर्घृण खून करण्यात आला. सांगलीतील रमामातानगरमध्ये रात्री साडे आठच्या सुमारास चौघा हल्लेखोरांनी पाठलाग करुन हा खून केला.

2016 मध्ये वारणानगरमधील नऊ कोटीचे प्रकरण उजेडात आले होते. एका शिक्षण संस्थेच्या संचालकाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या मुल्ला याने ही रक्कम चोरल्याचा संशय होता. त्यामध्ये नंतर पोलिस अधिकारी व काही कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल होऊन अटक झाली होती. नुकतेच सर्वजण जामिनावर मुक्त झाले होते. मोहिद्दीनही जामिनावर मुक्त होता. आज त्याचा खून करण्यात आला. 

हे पण वाचा धक्कादाय : मिरजेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भावाला मारण्याची दिली धमकी

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warnanagar theft case mohiddin mulla murder in sangali