शेताकडे जाताना त्यांच्या समोर काळ आला धावून

On the way to the field, time came running in front of them
On the way to the field, time came running in front of them
Updated on

इचलकरंजी ः  भरधाव ट्रॅक्‍टरने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात यड्राव (ता. शिरोळ) येथील 58 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सांगली नाका -टाकवडे मार्गावरील कचरा डेपोनजीक जुन्या जकात नाक्‍याजवळ घडली. तात्यासो आण्णासो दानोळे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर ट्रॅक्‍टरचालकाने पलायन केले. अपघातातील ट्रॅक्‍टरसह मोपेडवाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.

तात्यासो आजसकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून सहकारनगरकडून टाकवडे मार्गावरील शेताकडे जात होते. कचरा डेपोनजीक जुन्या जकात नाक्‍याजवळ आल्यानंतर टाकवडेकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्‍टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावर पडले. बेशुद्धावस्थेत पडल्याने नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. विकास तात्यासो दानोळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्‍टरचालकाविरोधात गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.  कोल्हापूर कोल्हापूर
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com