आठवडा बाजाराबरोबर संसारही थांबला 

आठवडा बाजाराबरोबर संसारही थांबला 
Updated on

गडहिंग्लज : गेला दीड महिना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आठवडी बाजार बंद आहेत. परिणामी, या बाजारातील विक्रेत्यांचे हाल सुरू झाले आहेत. पैशाची चणचण भासू लागल्याने विक्रेत्यांच्या कुटुंबीयांना अन्नही गोड लागेना झाले आहे. उसनवारी करुन पहिले काही दिवस पार पाडले. परंतु आता परिस्थिती अधिक बिकट बनत चालली आहे. शहर परिसरात एक हजारहून अधिक बाजार विक्रेते आहेत. 

सीमा भागातील सर्वात मोठा बाजार म्हणून गडहिंग्लजचा नावलौकिक आहे. भाजीपाल्याबरोबरच नारळ, प्लास्टिक साहित्य, कडधान्य, धान्य, चिरमुरे, फरसाण, अगरबत्ती, निरमा, साबण, फळे अशा विविध साहित्यांची विक्री विक्रेते आहेत. गडहिंग्लजसह लगतच्या आजरा, नेसरी, महागाव, चंदगड, गारगोटी, उत्तूर, पिंपळगाव, हलकर्णी या बाजारातही हे विक्रेते आठवडाभर नित्यनियमाने जाऊन व्यवसाय करतात. घाऊक बाजारातून वस्तू खरेदी करायच्या आणि बाजारात नेऊन विकायच्या. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातील थोड्या हिश्‍यातून कुटुंबाला हातभार लावायचा आणि उर्वरित पैशातून पुन्हा वस्तू खरेदी करायच्या असे व्यवसायाचे चक्र आहे. 

विक्रेत्यांच्या कुटुंबाची गुजरान केवळ आठवडा बाजारावर आहे. त्यामुळेच जगण्याच्या लढाईसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला हात ऊसनवारी करुन कुटुंबाचा गाडा हाकला. आता, मात्र मदत करणारेही दुरावू लागल्याने संकट वाढले आहे. सीमा भागात अशा विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. या सर्वानाच याचा फटका बसला आहे. 

आठवडा बाजारावर गुजराण करणारे आमच्या कुटुंबाची तिसरी पिढी कार्यरत आहे. उत्पन्नाचे कोणतेच स्त्रोत नसल्याने बाजार बंदमुळे कोंडी झाली आहे. ओढाताणीत अधिक दिवस काढणे त्रासाचे आहे. 
- मुनीर शेख, बाजार विक्रेते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com