चंदगडचा "हा' भाग तीन दिवस अंधारात...अन्य भागातही विजेचा लपंडाव

The Western Part Of Chandgad Was In Darkness For Three Days Kolhapur Marathi News
The Western Part Of Chandgad Was In Darkness For Three Days Kolhapur Marathi News

चंदगड : जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून वीज वाहिन्या तुटल्याने तालुक्‍याचा पश्‍चिम भाग तीन दिवसांपासून अंधारात आहे. अन्य भागातही सातत्याने वीजेच्या लपंडावाने ग्राहक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रभर वीज खंडीत केली जात असल्याने अडचणी वाढल्या आहेत. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर करीत आहेत. 

गेले तीन दिवस तालुक्‍यात अतिवृष्टी सुरू आहे. जोरदार पाऊस आणि वादळी वारा यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्या आहेत. बहुतांश भागात वीज पुरवठा खंडीत आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात कानूर, बिजूर, भोगोली, पुंद्रा, जांबरे, उमगाव, न्हावेली, कोकरे या भागात तीन दिवसापासून अंधाराचे साम्राज्य आहे.

कोरोनामुळे शहरस्थित नोकरवर्ग गावाकडे परतला आहे. अनेकजण लॅपटॉप, संगणक, मोबाईलच्या सहाय्याने ऑन लाईन काम करीत आहेत. परंतु वीजच नसल्याने ही उपकरणे कुचकामी ठरत आहेत. मोबाईल चार्जिंग करण्यासाठीसुध्दा वीज नसल्याने संपर्क खुंटला आहे. नातेवाईक, आप्तेष्टांची ख्याली, खुशाली विचारणे अशक्‍य झाले आहे. अतिवृष्टीमुळे या भागात पुरस्थिती असल्याने परगावातील नातेवाईकसुध्दा त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाहीत अशी स्थिती आहे.

चंदगड शहरात सुध्दा दोन दिवस आणि दोन रात्री वीज पुरवठा खंडीत होता. अजूनही तो सुरळीत झालेला नाही. दर पाच, दहा मिनीटाला प्रवाह खंडीत केला जात असल्याने नाराजीचा सूर आहे. गतवर्षी अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले. परंतु जूने अनुभवी कामगार निवृत्त झाले आहेत. नवीन कर्मचाऱ्यांना एखादा बिघाड समजण्यास उशीर लागत असल्याचे सांगितले जाते.

स्थानिक नागरीकांशी समन्यव साधून त्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन ही कामे मार्गी लावावी अशी मागणी होत आहे. दरम्यान यासंदर्भात सहाय्यक अभियंता श्री. लोधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन स्विकारला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com