
गडहिंग्लज : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवरील प्रशासक निवडीचा गुंता दिवसेंदिवस क्लिष्ट बनत आहे. स्पष्टता नसणारा ग्रामविकास विभागाचा आदेश अधिक संभ्रम वाढवत आहे. अशा परिस्थितीत निवडीचे अधिकार दिलेले पालकमंत्री कोणत्या योग्य व्यक्तीवर ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपविणार, यावरून गावागावांत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. यात आता शिक्षणाचा मुद्दाही उपस्थित होऊ लागला आहे. जनतेतून थेट निवड झालेल्या सरपंचांना शिक्षणाची अट लागू होती. त्यामुळे प्रशासकांचीही शैक्षणिक पात्रता पाहिली जाणार का, हा प्रश्न आहे.
कोरोनामुळे डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. यात गडहिंग्लज तालुक्यातील तब्बल 50 म्हणजे निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींवरील प्रशासक निवडीचे अधिकार ज्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिले आहेत. पण, त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी, यापलीकडे कोणतेही निकष लावलेले नाहीत. त्यामुळे प्रशासक निवडीचा मुद्दा चर्चेचा बनला आहे. योग्य व्यक्ती कोण यावरून गावागावांत चर्चा झडत आहेत.
दोन वर्षांपूर्वी जनतेतून थेट निवडलेल्या सरपंचांना शिक्षणाची अट लागू केली होती. 1995 नंतर जन्मलेल्या इच्छुक व्यक्तीला सातवी उत्तीर्ण असले अनिवार्य केले होते. त्यापूर्वी जन्म झालेल्यांना सवलत दिली होती. आता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले नाहीत. मात्र, त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी शिक्षणाची अट लावलेली होती. त्यामुळे आता मुदत संपणाऱ्या सरपंचांना पर्याय म्हणून निवडणाऱ्या प्रशासकांना शिक्षणाची अट लागू राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यकर्त्यांकडून लॉबिंग सुरू...
ग्रामपंचायतींची मुदत संपण्याचा दिवस जसा जवळ येईल, तशा कार्यकर्त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आपल्या विभागाचे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशी घेतल्या जात आहेत. त्यांच्या गाठीभेटीचे सत्र सुरू आहे. वजनदार नेत्यांना मध्यस्त घालून प्रशासकपदासाठी लॉबिंग केले जात असल्याचे दिसून येत आहे.
गडहिंग्लजच्या या 50 ग्रामपंचायती...
ऐनापूर, औरनाळ, अरळगुंडी, बसर्गे, बेळगुंदी, बुगडीकट्टी, चंदनकूड, चन्नेकुपी, चिंचेवाडी, दुगुनवाडी, दुंडगे, गिजवणे, हलकर्णी, हनिमनाळ, हरळी बुद्रुक, हसूरचंपू, हेब्बाळ जलद्याळ, हेब्बाळ कसबा नूल, हिरलगे, हुनगिनहाळ, इदरगुच्ची, इंचनाळ, जांभूळवाडी, जरळी, नूल, कानडेवाडी, खणदाळ, लिंगनूर तर्फ नेसरी, लिंगनूर कसबा नूल, मांगनूर तर्फ सावतवाडी, मनवाड, मासेवाडी, मुुंगुरवाडी, मुत्नाळ, नंदनवाड, नरेवाडी, निलजी, नौकूड, माद्याळ, कसबा नूल, सावतवाडी तर्फ नेसरी, शेंद्री, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, तळेवाडी, तेगिनहाळ, तेरणी, तुप्पूरवाडी, उंबरवाडी, वडरगे, वाघराळी.
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.