त्यांच्या मोबाईलवर महिलेचा व्हिडिओ कॉल आला अन्... 

WhatsApp Group Parents Want To Have
WhatsApp Group Parents Want To Have
Updated on

कोल्हापूर -‘हॅलो कोण बोलताय, तुम्ही कसा काय माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला?’ असा महिलेचा करड्या आवाजाचा फोनवरील महिलेचा प्रश्‍न कानावर पडताच सुशिक्षित पालकांची बोलती बंद झाली. मॅडम मी तुम्हाला फोन नाही केला... हो माझ्या मुलीच्या हातात फोन होता. चुकून लागला असेल खात्री करतो, असे म्हणत त्याने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती महिला ऐकून घेण्याच्या मनस्थिती नव्हती. तशी पालकाच्या पायाखालची वाळू सरकली. शहानिशा केल्यानंतर पालकांची मुलगी व संबंधित महिलेची मुलगी एकाच वर्गात होती. त्या दोघी शाळेच्या व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर आलेल्या संदेशाबाबत बोलताना हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्यानंर गैरसमज दूर झाले. हे झाल एक प्रातिनिधिक उदाहरण. असे प्रकार भविष्यात वाढण्याचे धोके वाढले आहेत. 

आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा वापर होणे अपेक्षितच आहे. शाळा खासगी शिकवणीतही तो केला जातो. या तंत्राची ओळख विद्यार्थ्यांना होते. ही पण जमेची बाजू आहे. पालक आज विद्यार्थ्यांच्या बाबतीत अधिक जागृक आहेत. स्पर्धेच्या युगात मुले शैक्षणिक दृष्ट्या कमी पडू नयेत अशी त्यांची भावना असते. मुलांच्या शाळेतील शिकवणीतील प्रगतीचा अहवाल पालक सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. यावर उपाय म्हणून शाळेंसह शिकवणीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे व्हॉटस्‌ ॲप ग्रुप तयार केले आहे. त्यावर आलेले संदेश पाहण्याची उत्सुकता पालकांची असते तितकीच विद्यार्थ्यांचीही असते. पालक त्यांच्याकडून मुले शाळा, शिकवणीच्या ग्रुपवर काय आले ते पाहण्यासाठी मुले 
मोबाईल घेतात. त्यानंतर पालकांचा डोळा चुकवून त्यावर चॅटींग अगर कॉल अगर व्हिडीओ कॉल करतात. यातूनच शालेय वयातच मुलांना मोबाईलचे व्यसन लागण्याचे धोके वाढले आहेत. तसेच गैरसमजातून पालकांना मनस्थाप देणारे प्रसंग उद्‌भवण्याचे धोकेही वाढले आहेत.

शिक्षकांकडून हे अपेक्षित...
  ग्रुपबाबत पालकांना माहिती द्यावी
  ग्रुपचा वापराचा हेतू स्पष्ट करावा
  पालकांना वैयक्तिक संदेश पाठवावेत
  मोबाईल न घेण्याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Police System
Rajaram Puri Ganesh Procession
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com