रस्त्यावरच्या गाड्यावर कारवाई कधी? 

रस्त्यावरच्या गाड्यावर कारवाई कधी? 

कोल्हापूर  : रस्त्यावर अनाधिकृतपणे बसून किरकोळ व्यवसाय करणे वाहतुकीला अडथळा आहे. मुख्य रस्त्यावर त्या विरोधात सुरू असलेली कार्यवाहीही समर्थनीय आहे. पण कारवाईत सापडणारे सर्व विक्रेते अतिशय किरकोळ आहेत. मात्र त्याच वेळी कोल्हापुरात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर किमती गाड्यांची रांगच्या रांग लावून त्याची लाखाच्या दरात विक्री करणाऱ्या काही मोटार विक्रेत्यावर कारवाई का होत नाही, याची नागरिकातून उलटसुलट चर्चा आहे. 

फेरीवाल्यांवर किंवा बुट्टीत भाजी घेऊन विकत बसणाऱ्या भाजीवाल्यावर कारवाई सहज सोपी आहे. मग रस्त्यावरच मोटारी विकणाऱ्यावर कारवाई करायला यंत्रणा का धजावत नाही, हे नागरिकांना पडलेले कोडे आहे. 

कोल्हापुरात गेले काही दिवस अतिक्रमण निर्मूलन मोहीम जोरात सुरू आहे. कोल्हापूर महापालिका व शहर वाहतूक शाखा यांची ही संयुक्त कारवाई आहे. विविध वस्तूंचे स्टॉल, दुकानांचे बोर्ड, लोखंडी कट्टे, खाद्यपदार्थांच्या छोट्या आकाराच्या गाड्या अशा स्वरूपाचे हे अतिक्रमण आहे. याशिवाय सीझन नुसार रस्त्यावर बसून विक्री करणारे द्राक्ष, गाजर ,पेरू ,अंजीर, पपई विक्रेते आहेत. अतिक्रमण निर्मूलन कारवाईत हे विक्रेते हमखास सापडतात. कारवाईच्या वेळी हातापाया पडून आपला माल सोडवून घेण्याचा प्रयत्न करतात. अर्थात त्यांचे एक दिवसाचे नुकसान ही त्यांना परवडणारे नसते. हे विक्रेते थोडाफार विरोधही करतात. मोहिमेच्या बळामुळे हतबल होतात. पण रस्त्यावर बसून विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी अंदाज घेत घेत रस्त्यावरच बसतात. 
या कारवाईचे लोक जरूर स्वागत करतात. कारण या अतिक्रमणाचा खरा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना व वाहनचालकांना होत असतो. 

पण शहराच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर रांगेने मोटारी लावून काहीजण मोटार विक्रीचा व्यवसाय करत आहेत. दुसऱ्या लोकांच्या दारात त्यांच्या मोटारी आहेत. त्यांच्या विरोधात तक्रार करायची ही चोरी आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाने अशा रस्त्यावरच्या मोटारी मात्र कधीही उचलून नेलेल्या नाहीत. भाजीवाले फळवाले यांच्या बुट्ट्या हात गाड्या ज्या तडफेने उचल्या जातात ते कर्मचारी या मोटार विक्रीकडे मात्र दुर्लक्ष करतात. कोल्हापुरात एका गल्लीत पन्नास मोटारी रांगेने लावलया आहेत. पण कारवाईची त्यांना कधीच भीती नाही अशी परिस्थिती आहे. या मोटार वि क्रेत्यासाठी काही विशेष धोरण असेल तर तसेच धोरण इतर फेरीवाल्यांसाठी ही राबवावे अशी फेरीवाल्यांची अपेक्षा आहे. 

रस्त्यावरच्या मोटारींच्या विक्री संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे. यादव नगरात संयुक्त पाहणी केली तेव्हा अशा असंख्य मोटारी रस्त्यावर दिसून आल्या. यासंदर्भात पुढील कारवाई लवकरच केली जाईल. ही कारवाई महापालिका व वाहतूक शाखा अशी संयुक्त होण्याची गरज आहे.....

- वसंत बाबर, निरीक्षक शहर वाहतूक शाखा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com