मंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करणार

 Will commit suicide in front of ministers house
Will commit suicide in front of ministers house
Updated on

कोल्हापूर : श्रावणबाळ व सेवा राज्य निवृत्तीच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या नाहीतर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्याच्या दारात आत्मदहन केले जाईल, असा इशारा देवदासी समाजाच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष अशोक भंडारे यांनी आज दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. सोमवार (ता.3) पर्यंत यावर निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन केले जाईल, असाही इशारा दिला. यासंदर्भाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले. 
देवदासी महिलांना संजय गांधी व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन मिळावे, यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. सरकारने अनेक वेळा याबाबत सकारात्मकता दाखवली पण, त्यांची अमलबजावणी झालेली नाही. आता नवीन सरकारने याकडे गांर्भियाने पाहिले पाहिजे. याशिवाया, गोरगरीब, विधवा आणि अनाथ असणाऱ्या देवदासींची घरकुलाची मागणीसाठी अजूनही लाल फितीत अडकली आहे. या तात्काळ मंजुरी दिली पाहिजे. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी याचा विचार करावा, नाहीतर काही दिवसातच त्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाच्या दारात सामूहिक आत्मदहन केले जाईल. असाही इशारा भंडारे यांनी दिला. 

निराधार, वयोवृध्द देवदासींना न्यायासाठी 25 वर्षे लढा दिला जात आहे. ज्या योजना यांच्यासाठी दिल्या जात आहेत. त्याच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयाला विनाकारण हेलपाटे मारायला लागत आहे. तरीही, याकडे लक्ष दिले जात नाही. अशा वेळेला आत्म दहन करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही, असेही भंडारी यांनी सांगितले. 
सोमवारी पालमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील हे जनता दरबार घेत आहे. यामध्येच देवदासींचा निर्णय झाला पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी, माजी नगरसेविका मायदेवी भंडारे, बनाबाई पुजारी, छाया चित्रक, नसिम देवडी, रेखा वडर, यल्लवा पुजारी, पंकज भंडारे, योगेश गवळी, शिवाजी शिंगे, रमेश साठे, मनाफ बेपारी, शालन कांबळे, दिलीप चित्रुक, इकबाल शेख, लताबाई कांबळे उपस्थित होते. 

मागण्या 
- श्रावणबाळ व सेवा राज्य निवृत्तीचा लाभ मिळावा 
- घरकुल योजनेत लाभ मिळावा 
- निवृत्ती वेतन मिळावे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com