कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नाही; व्यापाऱ्यांचा निर्णय

Will Not Participate In Any Closure; Gadhinglaj Merchants' Decision
Will Not Participate In Any Closure; Gadhinglaj Merchants' Decision

गडहिंग्लज : गेल्या काही दिवसापासून विविध पक्ष संघटनांकडून सातत्याने बंद पुकारले जात आहेत. सध्या मंदीचे चित्र असल्याने व्यवसायात अडचणी वाढल्या आहेत. त्यामध्ये बंदमुळे आणखी भर पडत आहे. त्यामुळे बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय येथील गडहिंग्लज शहर व तालुका व्यापारी संघटनेने घेतला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना दिले आहे. 

महाराष्ट्रात विविध कारणासाठी सातत्याने बंद पुकारले जात आहेत. मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या व्यावसायिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. बंदमुळे त्यांच्या अडचणीत भरच पडत आहे. व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शहर व तालुक्‍यातील सर्व व्यापाऱ्यांनी कोणत्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे. तरीही कोणत्या पक्षाकडून अथवा संघटनेकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे. 

तहसीलदार दिनेश पारगे यांनी निवेदन स्वीकारले. गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रोहन हंजी, किराणा भुसार असोसिएशनचे राजेश बोरगावे, सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे श्रीनिवास वेर्णेकर, कटलरी असोसिएशनचे योगेश शहा, कापड व्यापारी असोसिएशनचे दीपक शिवणे, केमिस्ट असोसिएशनचे संदीप मिसाळ, हॉटेल असोसिएशनचे सिदार्थ गाताडे, गुरुनाथ घुगरी, शिवानंद कोरी, अनिकेत बेल्लद, बसवराज जंगपन्नावर, गजानन मडलगी, सचिन येळापुरे, प्रवीण मेणशी, रामगोंडा पाटील, नागेश चौगुले आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 

सकाळी 11 पर्यंतच पाठिंबा... 
यापुढे कोणत्याही संघटनांकडून कोणत्याही कारणासाठी बंद पुकारला तर सकाळी 11 पर्यंतच बंद पाळला जाईल. त्यासाठी संबंधित पक्ष-संघटनेने दोन दिवस अगोदर व्यापारी असोसिएशनशी संपर्क साधणे आवश्‍यक आहे. तरच बंदला पाठिंबा दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com