कोवाडसह परिसरात यंदा थंडी उशिरा

This Year Winter Late In The Area Including Kowad Kolhapur Marathi News
This Year Winter Late In The Area Including Kowad Kolhapur Marathi News

कोवाड : कोवाड परिसरासह चंदगड तालुक्‍यात थंडीचे आगमन झाले आहे. परतीचा पाऊस थांबल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून थंडीला सुरवात झाली आहे. बोचरी थंडी जाणवू लागली आहे. आज परिसरातील तापमान 14 अंश सेल्सिअस होते. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. कापड दुकानातून उबदार कपड्यांसह स्वेटर, कानपट्टी, जाकेट, मफरल अशा कपड्यांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र आहे. 

परतीच्या पावसामुळे यावर्षी थंडीचे दिवस थोडे पुढे गेले. ऑक्‍टोबर महिन्यात फक्त पाऊस राहिल्याने थंडी जाणवली नाही. पावसाने उसंत घेताच नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीपासून थंडी जाणवू लागली. गेल्या आठ दिवसांपासून तर कडाक्‍याच्या थंडीला सुरवात झाली आहे. बोचऱ्या थंडीचा अनुभव जाणवत आहे. पहाटे धुके आणि गारठा असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्याही पेटविल्या जात आहेत. कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे थंडीत घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या तशी कमी होताना दिसत आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि सायंकाळी पुन्हा थंडी असे वातावरण आहे. दिवसभर हवेत गारवा जाणवत आहे. 

बॉडी लोशनच्या खरेदीकडे कल 
थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांची उबदार कपड्यांसह त्वचेची निगा राखण्यासाठी धडपड सुरू होते. त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे असे परिणाम होतात. त्यामुळे त्वचेचे संरक्षण करण्यासाठी बॉडी लोशनसारख्या साहित्यांची खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल दिसत आहे. 

खोकल्याच्या आजारात वाढ
हिवाळ्यात वातावरणात जसा बदल होतो तसा शरीरात बदल होतो. सध्या सकाळी हवेत गारठा आहे. दिवसभर वारा आहे. या वाऱ्यात गारवा असून सायंकाळच्या सुमारास पुन्हा थंडी जाणवत आहे. वातावरण बदलामुळे सर्दी, खोकल्याच्या आजारात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. 
- डॉ. एकनाथ पाटील

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com