सातबाऱ्यावर येणार पून्हा पिकपाहणी रकाना 

You will come to Satbara again to pick up your crops
You will come to Satbara again to pick up your crops

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, म्हणून या मागणीने जसा जोर धरला होता, त्याप्रमाणे सातबारावर पिक पाहणीचा रकाना कायम ठेवावा, म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती. त्यामुळे भाजप सरकारने काढून टाकलेला पिक पाहणीचा रकाना पुन्हा सातबारावर आणला जाणार आहे. यामुळे, जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण करताना भाजप सरकारने सातबारावरील पिक पाहणीचा रकामा काढून टाकला होता. याचा लाखो शेतकऱ्यांना फटका बसला होता. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यासह तालुकापातळीवरही मोर्चे निघाले, निवेदन दिली होती. तरीही, पिक पाहणीचा रकाना सातबारावर ठेवला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार सातबारावर पिक पाहणीसाठी इतर दुरूस्त्याही करण्याचे नियोजन करत आहेत. वास्तविक एखाद्या शेतकऱ्यांनी एखाद्याकडून शेती खरेदी केली, पण खरेदीपत्र करताना मुळ मालकांने चालढकल केली, त्यावेळी खरेदी घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने नावे पिक पाहणी किंवा कुळ म्हणून लावली आहेत.

याशिवाय, इनाम, देवस्थान जमिनीवरही कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पिकपाहणी रकान्यात नोंद होती. यावरून मूळ मालकाऐवजी कसणारा किंवा ती शेती कोणाच्या कब्जात आहे?, हे यावरून लक्षात येत होते. अनेकांनी आपली शेती दुसऱ्यांना विकली आहे. तसे संचकारपत्रही करून दिले आहे. अशा वेळेला मूळ मालकांऐवजी न्यायालयातून जमिन खरेदी करून घेताना पिक पाहणीचा रकानाही महत्वाचा समजला जातो. अशा वेळेला सातबारावरील हा रकाना काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. आता नव्याने या रकान्याची रचना सातबारावर केली जाणार आहे. मंत्र्याच्या उपस्थितीत झालेल्या लोकशाही दिनातही ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनीही याला दुजोरा दिला 
आहे. 

सातबाऱ्यात जे बदल झाले ते नव्याने आणण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याची चर्चा सुरू असून लोकांच्या मागणीनूसार बदल केले जात आहेत. 
- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री 

सातबारावरून गायब केलेला पिक पाहणीचा रकाना सातबारावर आला पाहिजे. शेतकऱ्यांची मागणी असतानाही याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, या सरकारने तरी शेतकऱ्यांना विश्‍वासात घेवून पिक पाहणीचा रकाना तात्काळ वाढवला पाहिजे. 
- विजय पाटील, चंदगड. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com