हातकणंगलेतील युवकाचा कोरोनाच्या भीतीपोटी ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू...

young man from Hatkanangle died of a heart attack due to fear of corona
young man from Hatkanangle died of a heart attack due to fear of corona
Updated on

हातकणंगले - कोरोनाच्या भीतीपोटी सलग दोन दिवस आलेल्या ह्रदयविकाराच्या दोन धक्क्यांनी येथील एका ३३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

संबंधित युवक लक्ष्मी औद्य़ोगिक वसाहतीमधील एका पाईप कारखान्यात नोकरीला होता. १७ तारखेला कंपनीत त्याची नेहमीप्रमाणे थर्मल टेस्ट केली असता, जास्त ताप असल्याने कंपनीत येण्यास मज्जाव केला. तेव्हांपासून तो घरीच राहून किरकोळ उपचार घेत होता. चार दिवसांपूर्वी त्याला जास्तच त्रास होऊ लागल्याने अनेक दवाखान्यांत नेण्यांत आले पण कुठेच अॅडमिट करून घेतले नाही. गेले काही दिवस तो कोरोनाच्या धास्तीखालीच होता.

शुक्रवारी पहाटे त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने येथील ग्रामीण रुग्णालयांत नेण्यात आले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला अर्धांगवायूची आणि सोबतच कोरोनाचीही लक्षणे दिसू लागल्याने आयजीएममध्ये पाठवण्यात आले. तेथे त्याची रॅपिड टेस्ट घेण्यांत आली. त्यात तो कोरोना पॉाझिटीव्ह आढळून आला. यामुळे परत त्याला मानसिक धक्का बसला आणि रात्री आलेल्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी आणि दोन लहान मुले असल्याने परिसरांत हळहळ व्यक्त होत आहे. हातकणंगले नगरपंचायत प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत त्याच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.    

संपादन - मतीन शेख                         

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com