sakal

बोलून बातमी शोधा

youth died accident near Kognoli belgaum marathi news

विनायक कृष्णात पाटील व शरद कृष्णात पाटील (वय 30) दोघे भाऊ हिरो होंडा दुचाकी घेऊन एमआयडीसी येथून कामावरून वाळकीकडे जात होते.

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या कोगनोळीजवळ दुचाकी अपघातात वाळकीचा युवक जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शेतकरी पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला. गुरुवारी (ता. 8) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विनायक कृष्णात पाटील (वय 31, रा. वाळकी) असे मयताचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 

विनायक कृष्णात पाटील व शरद कृष्णात पाटील (वय 30) दोघे भाऊ हिरो होंडा दुचाकी घेऊन एमआयडीसी येथून कामावरून वाळकीकडे जात होते.येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शेतकरी पेट्रोलपंपाजवळ आले असता दुचाकीवरील ताबा सुटून ती दुभाजकाच्या खांबावर आदळली. यामध्ये विनायक पाटील यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊ शरद पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत.


घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, बीट हवलदार राजू खानपन्नावर, अमर चंदनशिव यांनी भेट देऊन पाहणी केली. जखमी शरद पाटील यांना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. मृत विनायक पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

संपादन- अर्चना बनगे

go to top