
लहान मुलांपासून तरुणांपर्यंतच्या वयोगटात लोकप्रिय झालेल्या "पब्जी' या मोबाइल गेमचे मानसिक दुष्परिणाम समोर येऊ लागल्यामुळे समाजात चिंतेचे सूर उमटू लागले आहेत. केवळ "पब्जी'च नव्हे तर, विविध ऑनलाइन गेम आणि समाजमाध्यमांच्या ऍपचे मुलांना जणू व्यसनच जडू लागले आहे.
उत्तूर : लहान मुलांपासून तरुणांपर्यंतच्या वयोगटात लोकप्रिय झालेल्या "पब्जी' या मोबाइल गेमचे मानसिक दुष्परिणाम समोर येऊ लागल्यामुळे समाजात चिंतेचे सूर उमटू लागले आहेत. केवळ "पब्जी'च नव्हे तर, विविध ऑनलाइन गेम आणि समाजमाध्यमांच्या ऍपचे मुलांना जणू व्यसनच जडू लागले आहे. हा विळखा सोडवण्यासाठी आता उत्तूरमध्ये (ता. आजरा) पुढाकार घेतला जात असून युवकांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत करण्यात येणार आहे.
यासाठी "पुन्हा खेळूया मैदान गाजवूया' हा उपक्रम हाती घेतला आहे. याची सुरवात म्हणून गाव मर्यादीत सरपंच चषक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मैदानी खेळांमध्ये संपुर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळल्याने शरीर स्वस्थ राहते. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळल्याने संवाद वाडतो.
यापार्श्वमीवर क्रिकेट, फूटबॉल, उंचउडी, लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोबॉल यातील एक प्रयोग म्हणून गावातील जुन्या व नव्या खेळाडूंना सहभागी करून घेवून त्यांच्यासाठी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 5 ते 8 व 11 मार्चला होणार आहेत. गावमर्यादित असलेल्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील. इच्छूक खेळाडूंनी आपली नावे अनिल लोखंडे, किरण घेवडे, सचिन फाळके, चिकू बारदेस्कर यांचेकडे नावे नोंदवावीत.
मैदानी खेळ व्यक्ती आनंदाने खेळतात
मैदानी खेळ हे प्रत्येक वयोगटाचे व्यक्ती आनंदाने खेळतात. मैदानी खेळाकडे युवक वळल्यास पब्जी सारखे शरीर व मन बिघडवणारे खेळ कमी होतील. यासाठी हा उपक्रम आहे.
- अनिल लोखंडे , खेळाडू