"अतिवृष्टी'त सोलापूर शहरातील 1 हजार 445 घरे बाधित 

प्रमोद बोडके
Friday, 16 October 2020

कामांना सुरुवात 
अतिवृष्टीचे संकट आल्यानंतर महापालिकेच्यावतीने पाणी निचरा करण्याच्या कामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. ओपन नाला बांधणे, नाला दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. जवळपास 19 कामांना सुरुवात झाली आहे. बंदीस्त नाला लअईन टाकण्याच्या 22 कामांना तर नाला सफाई, ड्रेनेजलाइन सफाई, चर मारणे या पद्धतीची 23 कामे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहेत. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग सध्या महापुराच्या संकटाचा सामना करत आहे. सोलापूर शहरांमध्येही अतिवृष्टीचा फटका 1 हजार 445 घरांना बसल्याचे समोर आले आहे. 13 व 14 ऑक्‍टोबर रोजी सोलापूर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापुरातील विडी घरकुल, रामवाडी, आसरा, शेळगी या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. सोलापूर शहरात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका विभागीय कार्यालय क्रमांक दोनला बसला आहे. या विभागातील तब्बल 401 घरे बाधित झाली आहेत. 

विभागीय कार्यालय क्रमांक एक मधील 320 घरे, विभागीय कार्यालय क्रमांक तीनमधील 25 घरे, विभागीय कार्यालय क्रमांक चार मधील 230 घरे, विभागीय कार्यालय क्रमांक पाचमधील 281 घरे, विभागीय कार्यालय क्रमांक सहामधील 135 घरे, विभागीय कार्यालय क्रमांक सातमधील 50 घरे व विभागीय कार्यालय क्रमांक आठ मधील तीन घरांना अतिवृष्टीचा फटका बसल्याचे महापालिकेच्या पाहणीत समोर आले आहे. 

सोलापुरात ज्या दिवशी अतिवृष्टी होत होती त्या दिवशी व त्यानंतरच्या दिवशी तब्बल 71 ठिकाणाहून महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील सर्वाधिक 16 तक्रारी या विभागीय कार्यालय क्रमांक पाच मधील आहेत. विभागीय कार्यालय क्रमांक एक, तीन, चार येथून प्रत्येकी दहा तक्रारी तर विभागीय कार्यालय क्रमांक दोन येथून 13 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 thousand 445 houses in Solapur city affected due to heavy rains