सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कार्यालयांमध्ये सोमवारपासून 10 टक्‍के उपस्थिती 

तात्या लांडगे
Saturday, 18 April 2020

सरकारच्या आदेशानुसार... 

  • रोटेशन पध्दतीने शासकीय कार्यालयांमध्ये 10 टक्‍के कर्मचाऱ्यांनी उपस्थिती बंधनकारक 
  • लॉकडाउन काळात संबंधित विभागांच्या सचिवांनी ठोस उपाययोजना करावी 
  • मंत्रालय स्तरावरील सहसचिव व उपसचिवांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक 
  • महिला अधिकाऱ्यांना सवलतीचा निर्णय सचिव तथा कार्यालय प्रमुख घेतील 
  • मंत्रालयातील उपहारगृह तत्काळ सुरु करण्याची कार्यवाही करावी 
  • उपनगरीय रेल्वेवर अवलंबून असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बेस्टसह लालपरीची मदत 

सोलापूर : लॉकडाउन वाढण्यापूर्वी राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये पाच टक्‍के कर्मचारी उपस्थित राहतील, असे सरकारने स्पष्ट केले. मात्र, लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रोटेशन पध्दतीने 10 टक्‍के कर्मचारी उपस्थित राहतील, असा निर्णय शनिवारी (ता. 18) राज्य सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. 20) केली जाणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : अरे व्वा ! क्‍वारंटाईनमध्ये तो टेरेसवर झोपला म्हणूनच... 

कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 22 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज लक्षात घेऊन सरकारने सरकारी कार्यालयात 10 टक्‍के कर्मचारी रोटेशन पध्दतीने उपस्थित राहतील, असे सरकारने स्पष्ट केले. मंत्रालय स्तरावरील सहसचिव व उपसचिवांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे. मात्र, महिला अधिकाऱ्यांना सवलत देण्याचा निर्णय संबंधित कार्यालय प्रमुख तथा सचिवांनी घ्यावा, असेही सरकारने आदेशात नमूद केले आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मंत्रालयातील उपहारगृह तत्काळ सुरु केले जाणार असून तशा सूचनाही संबंधितांना दिल्या आहेत. 

हेही नक्‍की वाचा : महाविद्यालयीन परीक्षेबाबत ब्रेकिंग ! थेट तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचीच परीक्षा 

बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक 
मंत्रालय तथा बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील बहूतांश अधिकारी व कर्मचारी उपनगरीय रेल्वेवर अवलंबून आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे पूर्णपणे रेल्वेसेवा बंद आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट, नवी मुंबई परिवहन बससेवा आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असल्याने बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा एकही व्यक्‍ती अधिक नसावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे. 

 

हेही नक्‍की वाचा : परिवहनमंत्री म्हणाले ! उद्योग अन्‌ बससेवा सुरु करायचे नियोजन पण... 

 

अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लोकल रेल्वेच्या धर्तीवर बससेवा 
मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. बहूतांश कर्मचारी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. या बाबींचा विचार करुन सरकारने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी बससेवेचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सकाळी 7 ते 11 या वेळेत पश्‍चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर या रेल्वे स्थानकाजवळून मंत्रालयापर्यंतच्या सर्व टप्प्यांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन यावे. कामावरुन जाताना पुरेशा बस उपलब्ध करुन द्याव्यात आणि दोन बसमधील अंतर (वेळ) कमी असावी, याची दक्षता परिवहन महामंडळाने घ्यावी. जेणेकरुन एकाच बसमध्ये खूप गर्दी हाणोर नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. तर बृहन्मुंबईकरिता बेस्टतर्फे विशेष सेवा सुरु केली जाईल, असेही सरकारने आदेशात नमूद केले आहे. 

हेही नक्‍की वाचा : महाविद्यालयीन परीक्षेचा मोठा निर्णय ! देशभर एकच पॅटर्न 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10% attendance at government offices from Monday