स्मार्ट सिटीसाठी मिळाले 102 कोटी ! होटगी, आहेरवाडी, फताटेवाडीला महापालिका देणार पाणी

तात्या लांडगे
Thursday, 19 November 2020

ठळक बाबी... 

 • सोलापूर शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत होणार 49 प्रकल्पांची कामे
 • केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी योजनेसाठी मिळाले 49 कोटी
 • राज्य सरकारने स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्पांसाठी दिले 25 कोटी
 • महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या कामांसाठी मिळाले 28 कोटी
 • एनटीपीसीकडून सोलापूर ते उजनी पाईपलाईनसाठी आतापर्यंत मिळाले पाच कोटी
 • पुढील महिन्यात एनटीपीसी देणार स्मार्ट सिटीसाठी 104 कोटी
 • एनटीपीसीकडून मिळणाऱ्या रकमेतून फताटेवाडी, होटगी आणि आहेरवाडी या गावांना महापालिकेच्या माध्यमातून मिळणार पाणी

सोलापूर : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात 49 प्रकल्पांची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी प्रकल्पास आज 102 कोटी रुपये मिळाले. त्यात केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिकेचा हिस्सा आहे. पुढील महिन्यात 'एनटीपीसी'कडून स्मार्ट सिटीअंतर्गत कामांसाठी 104 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यासाठी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे- पाटील हे पाठपुरावा करीत आहेत.

ठळक बाबी... 

 • सोलापूर शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत होणार 49 प्रकल्पांची कामे
 • केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी योजनेसाठी मिळाले 49 कोटी
 • राज्य सरकारने स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्पांसाठी दिले 25 कोटी
 • महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या कामांसाठी मिळाले 28 कोटी
 • एनटीपीसीकडून सोलापूर ते उजनी पाईपलाईनसाठी आतापर्यंत मिळाले पाच कोटी
 • पुढील महिन्यात एनटीपीसी देणार स्मार्ट सिटीसाठी 104 कोटी
 • एनटीपीसीकडून मिळणाऱ्या रकमेतून फताटेवाडी, होटगी आणि आहेरवाडी या गावांना महापालिकेच्या माध्यमातून मिळणार पाणी

निधीअभावी रखडलेली तथा सुरु न झालेल्या प्रकल्पांना आता निधी मिळाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या सर्वच कामांना गती मिळेल, असा विश्‍वास ढेंगळे- पाटील यांनी व्यक्‍त केला. महापालिकेच्या माध्यमातून दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी, होटगी आणि फताटेवाडी या गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी एनटीपीसीकडून निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून चार पाण्याच्या टाक्‍या, फिल्टर प्लॅण्ट आणि वितरण व्यवस्था उभारली जाणार आहे. या कामांची निवीदा अंतिम झाली असून निधी मिळताच मक्‍तेदाराच्या माध्यमातून कामाला सुरवात केली जाणार आहे. दरम्यान, सोलापूर ते उजनी पाईपलाईनसाठी 'एनटीपीसी'कडून 250 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यातील पाच कोटी रुपये आतापर्यंत मिळाले असून पुढील महिन्यात 104 कोटी मिळणार असून उर्वरित निधी तत्काळ मिळावा, यासाठीही ढेंगळे- पाटील यांचा पाठपुरावा सुरु आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 102 crore for smart city! Municipal Corporation will provide water to Hotgi, Aherwadi, Fatatewadi