सोलापूरच्या ग्रामीण भागात 107 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

तीन तालुक्‍यात एकही रुग्ण नाही 
आजच्या अहवालानुसार अक्कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तीन तालुक्‍यांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे या तालुक्‍यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 107 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एकूण एक हजार 248 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 141 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 107 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 184 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. याशिवाय आज सात जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. हे सातही पुरुष आहेत. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 29 हजार 551 एवढी झाली आहे. कोरोनामुळे 885 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्त झाल्यामुळे अद्यापही दोन हजार 957 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. याशिवाय कोरोनामुक्त झाल्याने 26 हजार नऊ जणांना आपापल्या घरी सोडले आहे. आज माळीनगर (ता. माळशिरस) येथील 70, मुंढेवाडी (ता. पंढरपूर) येथील 65, माळशिरस येथील 64, मित्र नगर पंढरपूर येथील 78, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील 80, लिंकरोड पंढरपूर येथील 36, स्टेशन रोड पंढरपूर येथील 74 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 1071 (67), बार्शी- 5361 (175), करमाळा- 2011 (42), माढा- 3082 (102), माळशिरस- 5175 (104), मंगळवेढा- 1378 (35), मोहोळ- 1393 (75), उत्तर सोलापूर- 719 (35), पंढरपूर- 5873 (166), सांगोला- 2382 (36), दक्षिण सोलापूर- 1406 (44), एकूण- 29551 (885). 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 107 new coronavirus patients in rural Solapur