दहावी परीक्षेसाठी एका वर्गात 12 विद्यार्थी ! 20 नोव्हेंबरपासून बॅकलॉगची परीक्षा

तात्या लांडगे
Saturday, 14 November 2020

ठळक बाबी... 

  • 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत बारावी बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 
  • दहावीतील बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत परीक्षा 
  • एका वर्गात केवळ 12 विद्यार्थीच परीक्षेसाठी बसू शकणार 
  • विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षकास मास्क बंधनकारक; एक बेंज सोडून एक विद्यार्थी परीक्षेला बसणार 
  • परीक्षेला जाताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तपासणार ऑक्‍सिजन लेव्हल व टेंम्प्रेचर 

सोलापूर : दहावी- बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आता 20 नोव्हेंबरपासून परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एका वर्गात केवळ 12 विद्यार्थ्यांनाच बसू दिले जाणार आहे. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षकाचे टेंम्प्रेचर व ऑक्‍सिजन लेव्हल तपासण्यात येणार आहे. त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याचे पुणे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

 

ठळक बाबी... 

  • 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत बारावी बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 
  • दहावीतील बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत परीक्षा 
  • एका वर्गात केवळ 12 विद्यार्थीच परीक्षेसाठी बसू शकणार 
  • विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षकास मास्क बंधनकारक; एक बेंज सोडून एक विद्यार्थी परीक्षेला बसणार 
  • परीक्षेला जाताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तपासणार ऑक्‍सिजन लेव्हल व टेंम्प्रेचर 

 

सोलापूर जिल्ह्यातील 906 विद्यार्थी दहावीची तर एक हजार 422 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता 17 तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ परीक्षा केंद्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी बेगम कमरुनिस्सा हायस्कूल (77 विद्यार्थी), उमाबाई श्राविका हायस्कूल (47 विद्यार्थी), जैन गुरुकूल प्रशाला (21 विद्यार्थी), छत्रपती शिवाजी हायस्कूल (19 विद्यार्थी), सिध्देश्‍वर गर्ल्स हायस्कूल (42 विद्यार्थी), सुरेखा कल्याणशेट्टी हायस्कूल (63 विद्यार्थी), जवाहरलाल शेतकरी हायस्कूल, मंगळवेढा (35 विद्यार्थी), न्यू इंग्लिश हायस्कूल, सांगोला (43 विद्यार्थी), नागनाथ विद्यालय, मोहोळ (21 विद्यार्थी), दौलतराव विद्यालय, कासेगाव, पंढरपूर (95 विद्यार्थी), महात्मा गांधी विद्यालय, करमाळा (39 विद्यार्थी), एसडीजे मॉडेल स्कूल, बार्शी (206 विद्यार्थी), विद्यामंदिर वैराग (9 विद्यार्थी), नुतन विद्यालय, कुर्डूवाडी (39 विद्यार्थी), कृष्णानंद विद्यामंदिर, अकलूज (78 विद्यार्थी), बांडलिंग विद्यालय, फौंडशिरस (55 विद्यार्थी), शिवशंभू माध्य. विद्यालय, कन्हेर, माळशिरस (13 विद्यार्थी) अशी केंद्रे असल्याची माहिती शिक्षण विस्ताराधिकारी अशोक भांजे यांनी दिली. 
 

बारावी बॅकलॉग परीक्षेची केंद्रे 
ए.डी.जोशी विद्यालय (524 विद्यार्थी), शिवाजी विद्यालय, बार्शी (129 विद्यार्थी), यशवंतराव मोहिते विद्यालय, यशवंतनगर, अकलूज (74 विद्यार्थी), अभिनव माध्यमिक विद्यालय, वाशिंबे, करमाळा (96 विद्यार्थी), दौलतराव विद्यालय, पंढरपूर (148 विद्यार्थी), देशभक्‍त संभाजीराव गरड विद्यालय, मोहोळ (41 विद्यार्थी) आणि सांगोला विद्यामंदिर, सांगोला (45 विद्यार्थी) या परीक्षा केंद्रांवर बारावीतील बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 students in a class for 10th exam! Backlog exams from November 20th