जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे 1218 सदस्य बिनविरोध ! अर्जच न आल्याने रिक्त राहिल्या 68 जागा 

प्रमोद बोडके 
Thursday, 7 January 2021

जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये करमाळा तालुक्‍यातील दोन, माढा तालुक्‍यातील आठ, बार्शी तालुक्‍यातील 16, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील दोन, मोहोळ तालुक्‍यातील 13, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील प्रत्येकी एक, माळशिरस तालुक्‍यातील चार, सांगोल्यातील पाच, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील सहा आणि अक्कलकोट तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील 657 ग्रामपंचायतींसाठी 6 हजार 227 सदस्य निवडले जाणार होते. त्यापैकी तब्बल 1 हजार 218 सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. 68 जागांसाठी एकाही उमेदवाराचा अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. आता शिल्लक राहिलेल्या 4 हजार 943 जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक 227 ग्रामपंचायत सदस्य बार्शी तालुक्‍यातून बिनविरोध झाले आहेत. करमाळ्यातील 46, माढ्यातील 125, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 42, मोहोळमधील 176, पंढरपूर तालुक्‍यातील 100, माळशिरस तालुक्‍यातील 88, सांगोला तालुक्‍यातील 120, मंगळवेढा तालुक्‍यातील 41, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 81, अक्कलकोट तालुक्‍यातील 172 ग्रामपंचायत सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. 

बार्शी तालुक्‍यातील 27, माळशिरस तालुक्‍यातील 17, अक्कलकोट तालुक्‍यातील 15, उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्‍यातील प्रत्येकी एक, माढ्यातील दोन आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पाच जागांसाठी एकही वैध अर्ज न आल्याने या जागा आता रिक्त राहिल्या आहेत. 

ठळक 

  • हंजगी, महाळुंग, वैरागसाठी दाखल झाला नाही एकही अर्ज 
  • जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक 
  • या निवडणुकीतून निवडले जाणार 4943 ग्रामपंचायत सदस्य 
  • बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये बार्शी तालुका अव्वल 
  • सरपंच आरक्षण सोडत नंतर असल्याने निवडणुकीतील चुरस झाली कमी 

67 ग्रामपंचायती बिनविरोध 
जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये करमाळा तालुक्‍यातील दोन, माढा तालुक्‍यातील आठ, बार्शी तालुक्‍यातील 16, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील दोन, मोहोळ तालुक्‍यातील 13, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील प्रत्येकी एक, माळशिरस तालुक्‍यातील चार, सांगोल्यातील पाच, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील सहा आणि अक्कलकोट तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्या ग्रामपंचायतींची देखील सध्या निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेल्या ईव्हीएम मशिन अन्य जिल्ह्यांतून उपलब्ध करण्याची तयारी सुरू झाली आहे. 
- मिलिंद शंभरकर, 
जिल्हाधिकारी, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1218 members of Gram Panchayats in the district have been elected unopposed