esakal | विजयपूर रोड परिसरात 13 रुग्ण ! शहरात आढळले 30 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

21Corona_20akola_2001_1_2.jpg}

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 74 हजार 39 संशयितांची झाली टेस्ट 
  • आतापर्यंत आढळले शहरातील 12 हजार 417 जण कोरोना पॉझिटिव्ह 
  • एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत 659 जणांचा कोरोनाने घेतला बळी 
  • सध्या शहरातील 399 रुग्णांवर सुरु आहेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार 
  • आज 693 संशयितांमध्ये आढळले 30 पॉझिटिव्ह तर तिघांचा झाला मृत्यू 
विजयपूर रोड परिसरात 13 रुग्ण ! शहरात आढळले 30 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरात आज 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 4, 15 आणि 18 फेब्रुवारीला उपचारासाठी दाखल झालेल्या तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सिध्दार्थ नगरातील 42 वर्षीय पुरुष, अंत्रोळीकर नगरातील 79 वर्षीय पुरुष आणि साईनाथ नगर (होटगी रोड) येथील 53 वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 74 हजार 39 संशयितांची झाली टेस्ट 
  • आतापर्यंत आढळले शहरातील 12 हजार 417 जण कोरोना पॉझिटिव्ह 
  • एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत 659 जणांचा कोरोनाने घेतला बळी 
  • सध्या शहरातील 399 रुग्णांवर सुरु आहेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार 
  • आज 693 संशयितांमध्ये आढळले 30 पॉझिटिव्ह तर तिघांचा झाला मृत्यू 


शहरात कन्ना चौक, वसुंधरा महाविद्यालयाजवळ, आळदंकर चाळ (रेल्वे लाईन), वारद चाळ (मुरारजी पेठ), पार्श्‍वनाथ अपार्टमेंट (बुधवार पेठ), राजस्व नगर, समर्थ हौसिंग सोसायटी, आदित्य नगर, सोनिया नगर, निर्मिती विहार, विवेकानंद नगर, विजय देशमुख नगर (विजयपूर रोड), जुना कुंभारी नाका (राघवेंद्र टॉवरजवळ), गांधी नगर (अक्‍कलकोट रोड), लक्ष्मी मार्केट (दक्षिण कसबा), रामराज्य नगर (शेळगी), भवानी पेठ, जवाहर अपार्टमेंट (कामत हॉटेलजवळ), शेळगी (गावठाण), सत्यम शिवम सुंदरम अपार्टमेंट (सम्राट चौक), जुनी मिलजवळ (मुरारजी पेठ), राईजवन अपार्टमेंट (होटगी रोड) आणि वैद्यकीय महाविद्यालयातील वसतीगृह येथे आज 30 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे विजयपूर रोड परिसरातील विविध नगरांमध्ये तब्बल 13 रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील सुमारे 115 जण होम आणि इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान, कोरोना वाढत असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेकांवर आज महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने संयुक्‍त कारवाई करण्यात आली. त्यात मोठा दंडही वसूल करण्यात आला असून काही आस्थापना 30 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत.