माळशिरस तालुक्यात नव्याने 139 कोरोना पॉझिटिव्ह; तर एकूण रूग्णसंख्या 3015 वर

covid 19
covid 19
Updated on

अकलूज (सोलापूर) : माळशिरस तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शनिवारी प्राप्त अहवालानूसार 139 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रूग्णसंख्या 3015 वर तर मृतांची संख्या 59 वर गेली आहे.

माळशिरस तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्वाधिक रूग्ण तालुक्यात आढळले आहेत. आज प्राप्त आहवालात 139 रूग्ण आढळले असून एकूण 3015 रूग्णांपैकी आज अखेर 1777 रूग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर 1179 रूग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. तसेच अहवालानूसार तालुक्यातील उंबरे दहीगाव येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला असून आज अखेर एकूण 59 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 
तालुक्यात गेल्या दहा दिवसात दररोज सरासरी 100 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. गुरूवार(ता. 10) रोजी 106 रूग्ण शुक्रवार (ता.11) रोजी 81 रूग्ण तर शनिवार (ता.12) रोजी 93, रविवार (ता.13) रोजी 106 रूग्ण सोमवार (ता.14) रोजी 133, मंगळवार (ता.15) रोजी 85, बुधवार (ता.16) रोजी 116 तर गुरूवार (ता. 17) रोजी 106, शुक्रवार (ता.18) रोजी 131 तर आज शनिवार रोजी 139 रूग्ण असे या दहा दिवसातच एकूण 1096 रूग्णांची भर पडली आहे.

तालुक्यातील अकलूज यशवंतनगर व संग्रामनगर या तीन गावात शुक्रवारी (ता.11) पासून असलेला आठ दिवसांचा लॉकडाउनचा काल शेवटचा दिवस होता. आज अकलूज शहरातील सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक आंतर पाळणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com