सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू; 472 नवे बाधित 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

तालुकानिहाय बाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 835 (55), बार्शी- 4014 (138), करमाळा- 1613 (33), माढा- 2159 (64), माळशिरस- 3246 (62), मंगळवेढा- 1004 (18), मोहोळ- 931 (40), उत्तर सोलापूर- 648 (27), पंढरपूर- 4279 (104), सांगोला- 1431 (19), दक्षिण सोलापूर- 1196 (27), एकूण 21356 (587). 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 11 पुरुष तर चार महिलांचा समावेश आहे. आज एकूण दोन हजार 94 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 622 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 472 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 472 जणांमध्ये 284 पुरुष तर 188 महिलांचा समावेश आहे. 

ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या आता 21 हजार 356 एवढी झाली आहे. त्यामध्ये 13 हजार 163 पुरुष तर आठ हजार 193 महिला आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 587 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामध्ये 405 पुरुष तर 182 महिला आहेत. कोरोनाबाधित असल्यामुळे अद्यापही सहा हजार 867 जण दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत तर 13 हजार 902 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

आज कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 85 वर्षाचे पुरुष, वाघोली (ता. मोहोळ) येथील 55 वर्षाची महिला, शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथील 55 वर्षाचे पुरुष, उपळे दुमाला (ता. बार्शी) येथील 75 वर्षांचे पुरुष, कुर्डू (ता. माढा) येथील 70 वर्षाचे पुरुष, वाघोली (ता. माळशिरस) येथील 45 वर्षांची महिला, पानगाव (ता. बार्शी) येथील 78 वर्षाचे पुरुष, भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील 68 वर्षाचे पुरुष, नागणे प्लॉट बार्शी येथील 72 वर्षाची महिला, म्हैसगाव (ता. माढा) येथील 52 वर्षांचे पुरुष, कासारवाडी रोड बार्शी येथील 86 वर्षांचे पुरुष, शिवाजीनगर माढा येथील 65 वर्षाचे पुरुष, व्यंकटेश नगर पंढरपूर येथील 63 वर्षाची महिला, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 65 वर्षाची पुरुष, दर्शन मंडप पंढरपूर येथील 77 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 killed in corona in rural Solapur; 472 Newly disrupted