बार्शी तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरूच; दोन दिवसांत 153 बाधित 

प्रशांत काळे 
Monday, 31 August 2020

आत्तापर्यंत तालुक्‍यातील 1 हजार 718 जण उपचार होऊन बरे होऊन गेले आहेत. यामध्ये शहरातील 1 हजार 18 तर ग्रामीण भागातील 700 जण आहेत. 138 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहितीही कुंभार यांनी दिली. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर तालुक्‍यातील रविवार आणि सोमवारी प्राप्त झालेल्या 1447 तपासणी अहवालामध्ये 153 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 100 तर ग्रामीणमधील 53 असे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या 2 हजार 224 झाली आहे. एकाचा मृत्यू झाला असून तालुक्‍यातील मृतांची संख्या 90 झाली आहे, अशी माहिती तहसीलदार डी. बी. कुंभार यांनी दिली. 

शहरातील 1286 व ग्रामीणमधील 261 असे 14 अहवाल प्राप्त झाले. शहरातील 1086 व ग्रामीण मधील 208 असे 1294 जण निगेटिव्ह आहेत. शहरातील 152 व ग्रामीणमधील 92 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरात एक हजार 346 तर ग्रामीणमध्ये 878 असे एकूण 2 हजार 224 जण कोरोनाबाधित आहेत. शहरातील नाळे प्लॉट, राऊळ गल्ली, गोंधील प्लॉट, चोरमुले प्लॉट, ढगे मळा, देशमुख प्लॉट येथे प्रत्येकी तीन, लोखंड गल्ली आठ, मिरगणे कॉम्प्लेक्‍स चार, उपळाई रोड पाच, भोसले चौक सहा, मांगडे चाळ चार, गाडेगाव रोड चार, मंगळवार पेठ, देवणे गल्ली, पंकज नगर, जावळी प्लॉट, नेहरुनगर, सुभाषनगर, वाणी प्लॉट, नागणे प्लॉट, दाणे गल्ली, सोलापूर रोड, सावळे गल्ली येथे प्रत्येकी दोन जण, सुतार नेट, राऊत चाळ, वीर सावरकर चौक, लक्ष्मी नगर, नाईकवाडी प्लॉट, चाटे गल्ली, कॅन्सर हॉस्पिटल जवळ, कश्‍यपी प्लॉट, मनगिरे मळा, सोमवार पेठ, कसबा पेठ, जयशंकर मिल चाळ, जामगाव रोड, बार्शी गावठाण, व्हनकळस प्लॉट, कासारवाडी रोड, कुर्डुवाडी रोड, बाह्मण गल्ली, दत्तनगर, तानाजी चौक, बारंगुळे प्लॉट, पाटील प्लॉट, चव्हाण प्लॉट, नेहरुनगर, गवळे गल्ली, भोगेश्वरी चाळ येथे प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. ग्रामीण भागातील वैराग सात, बावी (आ) 6, उपळेदुमाला 3, तडवळे 6, गोरमाळे 2, मळेगाव 5, आगळगाव 6, नारी 2, इर्लेवाडी 5 तर नागोबाचीवाडी, तांदुळवाडी, गुळपोळी, पिंपळगाव, उंबरगे, खांडवी, गौडगाव, धामणगाव, काळेगाव येथे प्रत्येकी एक जण बाधित आढळला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 153 Corona infected in two days in Barshi taluka